7 NOV 2020 AT 11:10

तुझी नी माझी भेट ती स्मरली,
रोमांचित हे झाले तन मन।
कातरवेळी छळू लागली,
मला सख्या रे तुझी आठवण।
धुंद फुलांचा गंध पसरला,
गंधाळले ह्रदयाचे स्पंदन।
हवाहवासा स्पर्श तुझा तो,
आठवला अन शहारले मन।
वाऱ्यावरती भास तुझे अन,
कणाकणावर तुझेच शासन।
जगावेगळे नाते अपुले,
जसे वाटते रेशीम बंधन।

- ©Nilam