6 NOV 2020 AT 20:47

मनाच्या कोपर्‍यात जी सलते
ती जखम साजणा भरेल का?
तुझ्या नि माझ्या नात्यामधली
काळरात्र ही कधी सरेल का?
हळू हळू जे उडून गेले
ते प्रेम पुन्हा अवतरेल का?
जुनी शपथ जी विसरून गेलो
मनांस अपुल्या ती स्मरेल का?

- ©Nilam