21 NOV 2020 AT 16:26

मौनाचे बंधन सोड जरासे बोल तू
डोळ्यांमधून दे ना मनाचा कौल तू
कळ्या उमजून आल्या कधीच्या
लाजेचा पडदा आतातरी ग खोल तू

हवेमधे उधळून दे जरा गंध तुझा
बनू दे ना आता प्रेमाचा माहौल तू
विरहाच्या ऊन्हात सुकेल स्वप्न हे
दे प्रितीचा पाऊस अन दे ओल तू

- ©Nilam