Nil Khatal   (Nil khatal)
182 Followers · 264 Following

read more
Joined 2 November 2017


read more
Joined 2 November 2017
28 MAR 2023 AT 20:52

उघडेच ठेउनी दार, हे इथवर आले अंगण,
तु सारवलेली ओंजळ..तिच्यात फ़ुलांचे पैंजण…!

-


24 MAR 2023 AT 22:39

राहिला बॅगेत गजरा मोगऱ्याचा
सांग ओठांना तुझ्या नुकसान माझे..!

-


13 FEB 2023 AT 17:12

प्रेम कर भिल्लासारखं
बाणावरती खोचलेलं,
मातीमध्ये उगवून सुद्धा
मेघापर्यंत पोहोचलेलं..!

-


1 FEB 2023 AT 12:25

सावली देता देता । सावलीत निजलो
मृण्मयीसवे आता । पुन्हा सावली होण्या..!

-


23 JAN 2023 AT 22:54

तू चंचला तू कामिनी तू पद्मिनी तू राघिनी
तना मनात माझिया तुझी सदैव मोहिनी..!

-


23 JAN 2023 AT 17:52

ना आस स्पर्शाची, ना तुझ्या मिठीची
तुझ्या अस्तित्वाचा गंध,पुरेसा जगण्याला..!

-


16 JAN 2023 AT 16:47

जगू लागलो सुखात नंतर,
मागिल पाटी कोरी केली..!

-


11 JAN 2023 AT 16:30

ऊन आहे जोवरी तोवर
झाड होऊन थांबणे आले..!

-


2 JAN 2023 AT 21:18


रोखुनी वेडा चाळा तिचा तू बट हाताने सावरलेली
रेखीव गहिऱ्या डोळ्यांची तुझ्या ही नजर का गं...!

-


2 JAN 2023 AT 18:34

उन्हाच्या झोपडीमध्ये सुखाची सावली आली
बहू जन्मातली पुण्ये मुलीच्या पावली आली ..!❤️

-


Fetching Nil Khatal Quotes