माणसाने नेहेमी आपल्या
शब्दांशी प्रामाणिक राहावं....-
हसतच कुणीतरी भेटत असतं,
नकळत आपल्यापेक्षाही आपलसं वाटत असतं, केंव्हा कोण जाणे मनात घर करुन राहत असतं, ते जो पर्यंतजवळ आहे त्याला फूलासारखं जपायचंअसतं, दूर गेल्यावरही आठवण म्हणून मनात साठवायचं असतं, याचचं तर नाव "मैत्रीच" गाव असं असत..!
-
बऱ्याचदा लोक मी खूप अचूक आणि मी खूप चांगला आहे असं दाखवण्याचा प्रयत्न करत असतात....पण
कधी ना कधी...कुठे ना कुठे...कोणाच्या ना कोणाच्या...
आयुष्यात ती लोकं
चुकीचे आणि वाईट ठरलेली असतात...!-
काळजी घेणं हि काळाची गरज आहे..
आणि काळ बदलवायचा असेल
तर काळजी हि घेतलीच पाहिजे...!-
कधी कधी माणूस दिखावा करण्याच्या नादात!
माणुसकी पासून खूप भरकटला गेलेला असतो...!!-
कधी कधी दूरची वळणे ही,
जवळ येतायेत याची लागते आस....
कारण त्या प्रत्येक वळणावर,
तू असल्याचा होतो मला भास....!-
विचारांच्या या जळ्याला,
आचारांच्या कडानी गुंफा,
विचारांनी आणि आचारांनी,
मिळून
मनाचा पाया भक्कम होईल..-
हव्या असलेल्या गोष्टींचा मोह लागला कि,
नको असलेल्या गोष्टी आपोआप टाळल्या जातात...!-
माणसाच्या आयुष्याचा
पण किती खडतर प्रवास
असतो ना क्षणात होत्याचं
नव्हतं होत...कोणतं ही पाटबळ
नसताना त्याने शून्यातून स्वतःच
विश्व निर्माण केलं नी हे सर्व जेव्हा
डोळेभरून पाहण्याची वेळ आली...
तेव्हा स्वतःला संपवून
जगाचा निरोप घेतला...
भावपूर्ण श्रद्धांजली
सुशांतसिंह राजपूत.-
कुणाला आपला कंटाळा येईल इतकं
जवळ जाऊ नये,
चांगुलपणाचा ओझे वाटेल इतके
चांगले वागू नये,
कुणाला गरज नसेल आपली तर
तिथे रेंगाळत राहू नये,
नशिबाने जुळलेली नाती जपावी
पण स्वतःहून तोडू नये,
गोड बोलणे गोड वागणे कुणास
अवघड वाटू नये,
जवळपणाचे बंधन होईल इतके
जवळचे होऊ नये,
सहज विसरून जावे सारे इतके
सहज मनात जपू नये,
नकोसे होऊ आपण इतके
कोणाच्या आयुष्यात जाऊ नये,
याचा आपल्याला कंटाळा येईल
इतके आयुष्य जगूच नये....!-