तो होणारा प्रवास,
वाटेत येणारी नाती,
वाट अडवणारी जात.
पाय खेचनारी ती चार लोक,
नाईलाजाने घेतलेले निर्णय,
येणारा जाणारा पैसा,
भावनिक क्षण.
बाजूला सारलेले प्रेम,
अंगावर घेतलेला भार,
भावनांचा कोंडमारा,
कधी करून जातो,
हे उभ्या आयुष्यात
कळत नाही...
-
धारेवर धरल्या सारखं झालं होत आयुष्य
जिथे सुरू होणार होत तिथेच शेवट अवती भोवतीच होता ...
घेतलेले निर्णय आणि दिलेली आश्वासन
सतत बोचत होती नकळत ...
चोर सोडून संन्याशाला फाशी अस म्हणत
तीच म्हण आता सत्यात कधीच उतरली होती ...
सत्य शोधत शोधत उगाच
मर्यादा ओलांडण्याचा निर्णयावर ठाम राहिले होते..
घेतलेल्या निर्णयाने कधीच प्रश्नांची जागा घेतली होती
उत्तर मात्र आकाडतांडव करत पळ काढत होती...
होती जरा शांतता... थोडी होती घुटमळ
तोच ताळमेळ मात्र चांगलाच जुळून आला होता ...
एकंदरीतच हे असच घडतं होत सतत
उगाच का म्हणून आयुष्य टांगणीवर लागल होत...?
-
न बोलताही सार काही मांडायला ती उत्सुक होती ...
सार काही बोलूनही नबोल्या सारखीच होती
आयुष्य तिचं त्याच चार भिंतीत बंद होत ...
होती जरा जागा मोकळी ऐकणाऱ्याही होत्या त्याच चार भिंती
उगाच होता त्या लहानशा खिडकीला मान ...
त्याच खिडकी बाहेर डोकावून पाहायला उत्सुक होती ती फार ...
बोलणाराही बोलत नव्हता कारण एकटे पडले होते तिचे स्थान ...
मान पान काय तो चार दिवसांचाच होता ...
होता नव्हता तेवढा वेशीवर टांगला होता फार ...
-
बाहेरची वर्दळ अंगावर यायला करते ,
तेव्हा मात्र शहारलेले अंग अजुन घट करत
येणाऱ्या नवीन संकटांची फक्त वाट बघतच आयुष्य काढायचं का...?-
एकांतात बसलेली व्यक्तीला जेव्हा कळत, ज्याच्यासाठी आपण इथे आलेलो व तोच त्यावेळी तिथं अनुपस्थितीत आहे.
त्यावेळी त्याचा शोध तिथेच थांबतो अन त्या एकांताची उणीव आणखी वाढू लागते...-
त्या चंद्र काळोखात ती एकटीच होती,
सर्वत्र दरवळणारा रातरांनीचा सुगंधही होता...
चंद्र प्रकाशात दिसणारी तिची सावली जणू,
आठवणीत रमलेल दुसर मन...
अवती भवती नाचणारे रातकिडे ,
किर किर करीत तिच्या सोबत गातही होते...
निरागस मनाचे तिचे भाव काही सांगत होते,
अबोल मन,न बोलता सगळं काही बोलत होते..
#रात्र_काळोख
-
विखुरलेल्या वाटेवर ओंजळभर प्रेम होतं
हातात हात घेऊन चालताना तुमच आमच सेम होत...
आयुष्यातली लागलेली ठेच एक खून होती
तीच खून मैत्रीची जाणीव म्हणून कायम सोबत होती...
#friendshipdayspecial
-
ती त्या नात्याला एवढं जपून होती..
मग एवढा अट्टहास का म्हणून...?
वेळेनुसार सोयी देऊन सगळं सुरळीत आहे
नियतीला मात्र अवेळीच भाव...
लागणारी ठेच एवढी की घाव अगदी खोलवर,
समजून घेणारालाही ती अदृश्य वाटावी...
डोळ्यांना दिलासा फक्त पापणी मिटताना,
आतली जळजळ फक्त बघतांना...?
मनाचे दरवाजे सतत उघडे,पायवाटा जणू...
त्याच पाय वाटेवर सळसळणार रक्तही...?
#अदृश्य_भाव
-
निरव शांततेत जणु काही वंगाळ घडत होतं
चोहीकडल्या अंधारात चांदनही पडलेलं...
विचारांची मैफिल,
त्यात घड्याळात वाजलेले पहाटेचे पाच अन जरा संतत गतीने वाहणारा थंडगार वारा...
निसर्गाच्या पायथ्याशी नवीन जन्म घेऊ पाहत होता...
-
हो मी साधला होता संवाद स्वतःशीच
काही प्रश्न अनुत्तरीतच होते ...
जरा वेळ घालवला होता एकांतात,
एकांत मात्र शांतच होता...
नभांकडे पाहून त्याची बरसण्याची वाटही पाहिली,
पाऊस मात्र मातीचा सुगंध घेत तिच्यात रमलेला...
-