10 FEB 2019 AT 12:52

बाप माझा
जेव्हा वाटतं कधी एकटं
तू झळकतेस अश्रुमधून
तुझ्या आठवणींचे क्षण
गेले विसरायचे राहून..
तुझ्या मेहनतीची जाणिव
दिसे त्या घामामधून
तरी तुला सुखाचे दिवस
गेले पहायचे राहून..
नेहमी तू म्हणायचास
हे काम बघ करुन
तुझे ते अनुभव
गेले अनुभवायचे राहून..
आयुष्यभर कष्ट करतांना
हात गेले झिजून
झिजलेले हात तुझे
गेले न्याहाळायचे राहून..
जिवनज्योत संपविलास
फक्त दोन थेंब पाणी पिऊन
माझ्या कष्टाचे चार घास
गेले द्यायचे राहून..

- निखिल गद्देकार...