हासली पाहताच मजला
कोर ती नाजुकशी
अन् रातीने तियेच्या
तीट गाली लावली-
स्वतःच्याच आधारासाठी वाढलेल्या पारंब्या गाडून उभा असलेला वड! त्यातल्या काही गुंडाळून घेतलेला, सावली देणारा, आणि त्या खाली कोणीतरी लावलेले "जीना इसी का नाम है"!
-
आता तरी फुलांना, सांगा, बघा फुलोनी
आला वसंत ऋतू हा आला पहा फिरोनी
एकेक पान गळले, गेले तरु सुकोनी
तुम्हावरी तयांची आशा असे टिकोनी
कोकीळ गातसे पुन्हा, साची सुरेल गाणी
करीतो तुम्हास दिसतो पुन्हा पुन्हा विनवणी
या रे फुलून या रे घेऊन रंग भुवनी
ते इंद्रचाप गेले, आहे पहा विरोनी
आता तरी फुलांना, सांगा, बघा फुलोनी
आला वसंत ऋतू हा आला पहा फिरोनी-
आज मी तुज पाहिले चांदण्यात न्हाताना
चंद्रास पार ओघळून जाताना
कमनीय किनाऱ्यावरी तुझ्या फेन तरंग फुटताना
माड रोमावळीचे अंगावरी शहारताना
भागल्या रश्मीस एकदा भाळावरी टेकताना
आरुणी ओठांवरी तिन्हीसांज होताना
ओल्या पावलात माझी एकेक रात्र भिजताना
अन तंद्रीत स्वतःचा उभा जन्म भोगताना
©निखिल मोडक-
आईने ने जब से आपको देखा हैं
कुछ मगरूर सा हो गया हैं
तारीफें करता था पहले हमारी
अब खामियां दिखा रहा हैं
©निखिल मोडक-
दिशाहीन मी कुणा शोधतो
कशासाठी मी खुणा शोधतो
अक्षरेच आता काव्यातूनी
उगा अर्थ मी दुणा शोधतो
उभे रान सारे गेले जळूनी
राखेतूनी मी कणा शोधतो
झेलले किती घाव स्वत्वावरी
आधार दिधल्या घणा शोधतो
जिथे घात होतो उगा यौवनाचा
अर्थ काय त्या रणा शोधतो
असे दुःखी का प्रत्येक प्राणी
होई बुद्ध जो कारणा शोधतो
©निखिल मोडक-
जो कोसते हैं यहाँ बेवख्त बारिश को
उन्हें क्या पता के कही तूफान आया है-
वेदनादायी क्षणांना सण म्हणावे लागले
सलत्या जखमांस हसुनी व्रण म्हणावे लागले ॥
विखरून गेले दान जे झोळीत होते घेतले
राहिल्या काही कणांना धन म्हणावे लागले ॥
मानले मी रूख त्यांच्या सावल्या करपून गेल्या
पेटत्या उरल्या उन्हाला वन म्हणावे लागले ॥
केला तयांनी यत्न माझी मूर्त ही घडवावयाचा
राहिल्या दगडास मजला मन म्हणावे लागले
द्यायचे आता न मजला राहिले कोणास काही
राहिल्या हास्यास तरिही ऋण म्हणावे लागले ॥
©निखिल मोडक-
कोई कैसे भूल सकता है किसी गुल को
कुछ खुशबू से याद रह जाते हैं कुछ काटों से-
राहिलेल्या त्या क्षणांचा हिशोबही खोटाच होता
डाव तुजला जिंकण्याचा हारला केव्हाच होता
लक्तरे माझ्या व्यथेची टांगली मी वेशीवरी
तुज काही वाटेल त्याचे, अंदाज हा चुकलाच होता
आता कशाला गायची मी वेदनेची आर्त गाणी
अर्थ तुज समजेल काही, हट्ट हा वेडाच होता
©निखिल मोडक-