निखिल केतकर   (निखिल केतकर)
36 Followers · 35 Following

read more
Joined 31 May 2020


read more
Joined 31 May 2020

आज त्याला दुसऱ्या मुलीसोबत हसता खिदळताना बघून का कोण जाणे तिला राग आला.
तशी बर्याच वर्षांपासूनची त्यांची मैत्री होती पण कधी दोघांच्या मनात एकमेकांबद्दल "त्या" प्रकारच्या भावना आल्या नाहीत किंवा दोघांनी कधी बोलून दाखवल्या नाहीत.
आज सहजपणे तिला प्रश्न पडला "का आपल्याला राग यावा? त्याला दुसऱ्या कोणासोबत बघताना...
" त्याने देखील तिला बघून न बघितल्या सारखे केले तिला येणाऱ्या रागाचा त्याला हेवा वाटतं होता तोदेखील विचारात पडला इतक्या वर्षांची मैत्री पण एकमेकांना कधी "त्या" नात्याने खरचं आपण बघितले नाही की विचार येउन ही जाणून बुजून तो विषय टाळत राहिलो
का तर बहुतेक असलेले नातं ही तुटेल म्हणून की आपण का पुढाकार घ्यावा म्हणून?
खरचं हे "नातं" नावाचे कोडे काही औरच असते, प्रत्येकाला नाही सांभाळता येत हे "नातं" नावाचं कोड...
तुमच ही अस कधी झालयं का?

-



एक प्रश्न पडला सहजच,
कधी अशुभातुन ही काही शुभ घडू शकते का❓
शेवटी एकाच नाण्याच्या दोन बाजू...

-


23 DEC 2021 AT 23:51

त्यांचे नातं काय हे सांगणे कठीण आहे...
ईतकी वर्ष झाली मैत्रीला त्यांच्या,
एकमेकांचा रुसवा - फुगवा काढता काढता तर कधी टोमणे, कधी अबोला
आणि कधी ही तासंतास फोनवर न बोलता अन स्वत:हून न सांगता ही कळून येणारी मनातली घालमेल यातून ती अजून घट्ट कधी झाली हे कळले देखील नाही.
तसे पाहता ही मैत्री काही मित्र सोडले तर कोणाच्या नजरेत कधी आली नाही,
त्यांना वाटायचे त्यांच्यात काही तरी चालू होतं...
मात्र दोघेही आपल्या वाटेवरती चालत असले
तरी बहुतेक दोघांनाही प्रेमाचा वारा कधी लागला नाही हे नवलच म्हणायचे.
बहुतेक दोघांनाही प्रेमा पेक्षा मैत्री जास्त जवळची वाटली असावी.
थोडक्यात काय तर अशी मैत्री सहजपणे मागून मिळत नाही किंवा होत ही नाही.

-


13 DEC 2021 AT 19:47

जेव्हा तुमच्या सोबत बोलणारे कोणीही नसते
तेव्हा मनातल्या त्या साचलेल्या गोष्टी आत कुठे तरी घर करून राहतात नाही तर सहजपणे त्या कागदावर उतरतात...
त्या सगळ्यांनाच समजायला हव्यात किंवा समजतील असे ही नाही पण समजून घेईल अशी एखादी व्यक्ती असावी इतकीच अपेक्षा...

-


27 NOV 2021 AT 22:03

अस्तित्व संपले की उरतात ते फक्त आठवणींचे सांगाडे...

-


15 NOV 2021 AT 23:42

हसताना तिच्या गालावर एक गोड खळी पडायची,
बघताना तिला माझी नजर मात्र तिच्यावरच खिळून राहायची...
लक्षात येताच तिला लटक्या रागाने काय एकटक पाहतोय म्हणून विचारायची,
सांगू कसे तिला
मलाच भिती वाटते की चुकून माझीच नजर तुला लागायची...

-


13 NOV 2021 AT 18:31

Middle class people never fall in love,
they do arrange marriages...

-



तुला आवडायचा चहा
मला आवडायची कॉफी
कधी कधी वाटायच
तुच माझी गोड - लुसलुशीत बर्फी

तुझ्या अदांवर झालो होतो फिदा
ब्रेकअप वेळी जेव्हा मागितलास तु खांदा
रडून रडून नाक झाल होत लाल
नाक म्हणाले रुमालाला, अब तुही मुझे संभाल

तुझ्या लडिवाळ हट्टावर मन माझे झुरे
तुझ मन सांभाळायला क्षण पडती अपुरे
तुझ्या अश्या हट्टापायी बरेच बोल खाल्ले
फक्त तुझ्यासाठी अनेकांशी संबंधही तोडले

अचानक मनाला चटका लावून गेलीस
जीव आता एकटा होतो कासावीस
संपले सर्व काही फक्त आठवण उरली
दारातली तुळस परत कधीच नाही मोहरली...
परत कधीच नाही मोहरली...

-



आज मला बोलायचय आपल्या नात्याबद्दल
माहीत नाही तु त्यात होतीस की नाही
बरचसं काही शेअर करायचो एकमेकांशी
पण ते बंध कधी निर्माण झालेच नाही

प्रत्येक गोष्ट एकमेकांना सांगुन करायचो
नात्याला जपायची धडपड करायचो
एकमेकांना समजून घेताना मात्र
गैरसमज कधी निर्माण झाले कळलेच नाही

नात्याला सांभाळण आपल्याला कधी जमलच नाही
नात्यातला ओलावा कधी उमगलाच नाही
उमजेल कधी तरी आपल्या मनातल म्हणुन
मनातली खदखद कधी बोलुन दाखवलीच नाही

एकमेकांसाठी वेडे मन झुरते आहे
मन मोकळे व्हायला आतुरले आहे
पण आपण कमीपणा का घ्यायचा
म्हणुन मन रडत आहे

आता वाटते थांबवावे सर्व
घेऊन मिठीत एकमेकांना
सुरू करावे नवे पर्व
सुरू करावे नवे पर्व

-



Nowadays,
they rarely communicate,
maybe they have become a strangers to each other...

-


Fetching निखिल केतकर Quotes