होऊनी सारा भावनांचा कल्लोळ
नकळत सारे घडले..!!
सांगड तया सोबती माझी
कित्तेक वर्षांपासूनही घट्ट जुळलेली,
पण त्यातही विसकटांना
आपली संवेदना हि हरवलेली!!
गुलाबी नात्याची होती गंमत
रस्ता चुकूनच का अडखळली,
आणि गैरसमजाने त्यात मग
उगाच जीवघेणी खेळी खेळली !!
प्रश्न दोन जीवांचा खरा पण
दोन तेच का म्हणून हरावे!!
अनोळखी शत्रूच्या पुढ्यात ते
तुरुंगात बंध अडकावे ..!!
-
https://marathi.pratilipi.com/user/f6xonu5024?utm_source=... read more
आंब्याला जणू मोहोर फुलावा
नुकताच कळीतला मोगरा लाजवा..
सुमधुर वाद्यांची तार छेडली जावी
अन गुलाबी वाऱ्याची झुळूक हळूच स्पर्शावी..
चंदेरी रात्री जणू चांदण्यांची गाणी
मनास मंत्रमुग्ध करणारी रातराणी..
गालातल्या गालात लाजणारी खळी जशी,
गरव्यात नुकतीच उमललेली पालवी जशी..
गुंफलेली आतुरता कोवळ्या मनाला
स्मित फुलवीत खुणावते जीवाला..
एकच कसे हे भास कहाणीचे व्हावे
स्वप्नवत वाटणारे तुझे कवडसे सत्यात यावे..
-
लडिवाळ ती आज का
शांत शांत भासली...
नको नको त्या कलहात
बहुदा उगाच ती फसली...
नकळत जेव्हा वावरतांना
बेभान होऊ तिनं केले..
क्षणो क्षणी त्या समयानं
तीस जगणे अवघड केले..
उमलतांना जणू कोवळी
कळीचं उमलत होती..
परंतु गुलाबी दर्पामागे
काटेरी बोल बोचत होती..
अशी कितीदा नव्याने
सिद्ध व्हावी खूण तिची..
परीक्षार्थी परिजनच ठरतांना
काय हो चूक तिची.. ❗
-
एकटा सलणारा जीव कसा
जो गपचूप शांत भासतो
परंतु स्वयंम युद्धात तोच
किती खोलवर अक्रांदतो ‼️
द्विमनात फसताना जेव्हा
नकळत वाचा बंदी होते
हळू हळू प्रत्येक त्रासाची
निमूट कोंडी मात्र होते ‼️
नको नको म्हणतांना सुद्धा
परीक्षा हिच समजावी स्वतः ची
परी उरावी ओल आसवंची
अन आस एका कोवळ्या हाकेची ‼️
-
दिस नकळत गेल्या क्षणामध्ये विरघळत
दिस नको त्या उगीच क्षणात रडत..
शांतता ही वाटे भयावह ही
मनासं कधीतरी कातरणारी..
स्वसंवाद ही जेव्हा नकोसा वाटे
जाणवत सर्वत्र बोचनारी काटे..
जाहिरात आपलीच कोण छापतात
नकळत क्षमतेची धिंड काढतात..
किती समजवावे आपण स्वतःला च
नकळत आपलीच धैर्य खचतात..
-
एकटा सलणारा जीव कसा
जो गपचूप शांत भासतो
परंतु स्वयंम युद्धात तोच
किती खोलवर अक्रांदतो ‼️
द्विमनात फसताना जेव्हा
नकळत वाचा बंदी होते
हळू हळू प्रत्येक त्रासाची
निमूट कोंडी मात्र होते ‼️
नको नको म्हणतांना सुद्धा
परीक्षा हिच समजावी स्वतः ची
परी उरावी ओल आसवंची
अन आस एका कोवळ्या हाकेची ‼️
-
चूक...
लडिवाळ ती आज का
शांत शांत भासली...
नको नको त्या कलहात
बहुदा उगाच ती फसली...
नकळत जेव्हा वावरतांना
बेभान होऊ तिनं केले..
क्षणो क्षणी त्या समयानं
तीस जगणे अवघड केले..
उमलतांना जणू कोवळी
कळीचं उमलत होती..
परंतु गुलाबी दर्पामागे
काटेरी बोल बोचत होती..
अशी कितीदा नव्याने
सिद्ध व्हावी खूण तिची..
परीक्षार्थी परिजनच ठरतांना
काय हो चूक तिची.. ❗-
झुडूपातुन डोकावत आज
लडिवाळ कशी बघ हसली..
करतात हरवलेली बाब पाहताच
कौतुकाने सहज अशी बागडली..!
वाहतांना पाहिलेली शिंपले स्वप्नांची
अलगद जणू ओझंळीत पडली..
न्याहाळतांना प्रथमच समक्ष त्यांस
आनंदाची खळी मग फुलली..!
चांदण्याच्या चंदेरी रात्री
एका चांदनीचे स्वप्न ते ..
दृढ संकल्प साक्षीने
प्रभा तीक्ष्ण च भासते..!!-
कटु अनुभवांना वारंवार अंगावर झेलून
तयार झालेलं मन ,
बाहेरून कठीण आणि तितकंच सतर्क झालेलं असतं.
अनुभवांचे हेच धडे, नाहिका ‼️-
आजच्या आभासी जगात
मुखवट्यांच्या गर्दीत हरवून न जाता
खरे पण ओळखणं एक
अग्निदिव्यच नाही का ❗️
-