Namrata Jambhavadekar   (✍️नम्रता जांभवडेकर)
2 Followers · 3 Following

Joined 19 May 2021


Joined 19 May 2021
21 MAR AT 23:06

विषय : जागतिक काव्य दिन

मनातल्या भावना
गुंफल्या शब्दांत
यमक जुळूनी
सजल्या काव्यात

लपवते दुःखाचे अश्रू
सुखाच्या क्षणांना हळूवार जपते
अव्यक्त भावनांना
काव्यरूपी शब्दात मांडते

काव्याचे अनेक प्रकार
बाराखडी, अष्टाक्षरी अन् सायली
अर्थपूर्ण कविता होते तयार
मदतीस असे जेव्हा नियमावली.

-


14 MAR AT 1:37

विषय : धुलीवंदन

हा सण राधा-कृष्णच्या प्रेमाचा
सप्तरंगी रंगात रंगण्याचा
लुटूया आनंद सारे मिळूनी
या धुलीवंदनाच्या दिनी!

-


14 MAR AT 1:29

विषय : होळी

चाहूल वसंत ऋतूच्या आगमनाची
करू तयारी होलिका मातेच्या पूजनाची
नकारात्मक शक्तींचा नारळ अर्पूनी दहनात
सकारात्मक ऊर्जा पसरे प्रत्येकाच्या मनात.

-


8 MAR AT 20:37

काव्य प्रकार - काव्यांजली काव्य

शीर्षक - मानिनी तू रणरागिणी

एक हाती
पेलते घराची जबाबदारी
सशक्त नारी
गृहिणी

सोसल्या हालअपेष्टा
स्त्री शिक्षणासाठी लढली
ना डगमगली
सावित्रीबाई

रूग्णांच्या सेवेत
सदा तत्पर असते
अनेकांना देते
जीवनदान

शोधूनी सत्य
गुन्हेगारास करते शासन
चुकीचे वर्तन
संपवते

विविध पात्रांतून
आदर्श निर्माण करते
व्यक्त होते
लेखणीतून.

-


14 FEB AT 21:04

काव्य प्रकार - बाराखडी काव्य

म - मनी सदा तू वसतेस
मा - माझ्या स्वप्नांवर राज्यही करतेस
मि - मिठी तुझी मज हवीहवीशी वाटे
मी - मीही त्यात सहज विरघळून जातो

मु - मुरते प्रेम दोन जीवांचे
मू - मूक संवाद होई नजरेने
मे - मेनकाही वाटती तुझ्यासमोर फिक्या तेव्हा
मै - मैत्रिणींच्या चिडवण्याने येते गालावरी लाली जेव्हा

मो - मोठा होईल आपल्या लग्नाचा सोहळा
मौ - मौन व्रत पाळत एकमेकांना पाहू आपण
मं - मंगलाष्टक गात सभोवताली होतील आप्तेष्ट गोळा
म: - महासोहळ्यास हजर राहण्याचे सर्वांना आग्रहाचे आमंत्रण!

-


14 JAN AT 21:00

शीर्षक - मकरसंक्रांत
हा
सण
गोडवा
वाटण्याचा,
पतंगा सवे
भरारी घेण्याचा,
रंगीेबेरंगी
फुटाण्याचा,
आस्वाद
घेऊ
हो.

-


14 NOV 2024 AT 21:06

काव्य प्रकार : सायली काव्य

शीर्षक : तुळस

अंगणी
इवलेसे रोपटे
वृंदावनीच्या कुशीत विसावते
मायेच्या स्पर्शाने
बहरते

प्रारंभ
आजच्या दिनी
तुलसी विवाह लावूनी
कन्यादानाचे पुण्य
पदरात

-


29 OCT 2024 AT 23:34

शिर्षक : धनत्रयोदशी

दिव्यांचा लख्ख प्रकाश पसरला
धनत्रयोदशीच्या दिनी
लाभो तुम्हांस सुख समृद्धी
हिचं इच्छा असे मनी

पूजा करूनी धन, धान्याची
मागू निरोगी अन् आनंदी आयुष्य
कष्टास मिळूनी यशाची साथ
उज्वल होवो तुमचे भविष्य!

-


28 OCT 2024 AT 21:14

शिर्षक : वसुबारस

वसुबारसचा सण आला
पूजा करूया गोमातेची
अर्पुनी पुरणपोळीचा नैवद्य
प्रार्थना असे मनी लेकरांच्या कल्याणाची!

-


12 OCT 2024 AT 22:27

शिर्षक - दसरा

हा
आला
उत्सव
विजयाचा
लुटूनी सोने
हर्ष वाटण्याचा
साजरा करू
दसऱ्याचा
सोनेरी
सण
तो.

-


Fetching Namrata Jambhavadekar Quotes