मनोरमा मुसळे   (मनु)
406 Followers · 60 Following

Joined 4 August 2018


Joined 4 August 2018

घे भरारी उंच नभी तू
कवेत घे आकाश
तोडून पिंजरा बंधनाचा
मुक्त घे तू श्वास ......
सौ . मनोरमा मुसळे

-



और एक जखम आ ही जाता है

-



भेट अशी घडली
एैन वळण मार्गावरती
पण वेळच चुकीची ठरली
आयुष्याच्या वाटेवरती.....

-



प्रत्येक ओळ ही अनुभवाची
गाथा सांगून जाते
आयुष्यातील चढ उतार
शब्दात मांडून जाते

-



आता कुठेतरी थांबायला पाहिजे
खूप जगलोत इतरांसाठी
आता स्वतःसाठी थोड जगायला पाहिजे

-



तुला घडवताना
जीवाचा आटापिटा खूप झाला
काही सुखद तर काही वेदनादायक त्रास
खूप सहन केला
पण तू डोळ्यांना दिसता क्षणी
त्या त्या त्रासाला मायेचा बहर आला .....

-



अपरिचित अनोळखी
खेळ कसा खेळतो
नजरे आड लपून तो
रोज मला छेळतो

-



आनंदाच्या पायघड्यांची
चाहूल मज लागली
तुला भेटण्याची
ओढ मनी दाटली

-



उद्याच्या नवीन पिढीचे
आज कसे मढे निघाले
आधारस्तंभ भारताचे
का असे व्यसनाधीन झाले .....

व्यसनापाई कित्येक जीव गेले
कित्येक कुटुंबातील वंशज असे
अर्थीवर झोपलेले पाहिले मी
व्यसनापाई कित्येक शरीर किडलेले
पाहिले मी .....

रत्नजडित मुकुटातील रत्न तुम्ही
घडवा न भविष्याची कहाणी
का असे व्यसनाधीन होऊन
उद्धवस्त करता तुम्ही कहाणी .....

कुटुंबातील फुललेल फुल तुम्ही
करा न सुगंधीत आपल्या गंधानी
नका असे कोमेजून जाऊ
रचुया भविष्याची कहाणी ........

सौ. मनोरमा मुसळे






-



प्रत्येकच मनाच्या गाभाऱ्यात
एक अस पान असतं
जे हृदयाच्या कोपऱ्यात
ठाव धरून बसतं

-


Fetching मनोरमा मुसळे Quotes