तुझ्या माझ्या गोष्टीला, सुरूवात नाही
तुझ्या माझ्या वेदनेला, अंत नाही...-
मनातल्या मनात 💕
(मनातल्या मनात 💕)
8 Followers · 5 Following
अलगद अलवार मंजूळ मधूर हळवी अल्लड अवखळ भावनांच्या प्रत्येक तरंगाला आनंदाने झेलत मनसोक्त आणि... read more
Joined 21 September 2022
10 JUN AT 7:46
9 JUN AT 7:20
सावली सारखा पाठीशी राहीन,
असं तो नेहमी म्हणायचा
अंधाराची भिती वाटते मला,
नेमका तिथेच तो हरवला-
9 JUN AT 7:18
नको आठवणींचे हळुवार वारे
नको स्पंदनांचे अलवार हिंदोळे
पुन्हा पाटीवरचे शब्द झाले कोरे
जेव्हा नजरेला भिडले डोळे ओले-
5 JUN AT 20:19
अनोळखी होऊन पुन्हा
ओळखीचे नको ओरखडे
केलाय मी असा काय गुन्हा
तुझ्याच मागे धावे मन वेडे-
5 JUN AT 10:26
जे सुरू झालंच नाही
ते संपायची भिती कशाला
जे स्विकारलंच नाही
ते गमवायची खंत कशाला-
17 APR AT 21:02
डोळ्यांचं एक बरं असतं
मनाचे घाव त्याला दिसत नाही
वेदना लपवताना मग ...
आसवांची मैफिल बसत नाही-
15 APR AT 0:12
मनाच्या हिंदोळ्यावर
शब्दा़ंची पाखरं बसतात
भावनांच्या तारा छेडत
गगनभरारी घेतात...-
14 APR AT 23:56
आपल्यात कुठलाच आता
वाद राहिला नाही
तितकंच खरं की
आता साथ राहिली नाही-
14 APR AT 17:43
रोज जाणिव होते,
तू दूर गेल्याची....
मनात गोठलेलं असलं तरी
आपल्यातलं सगळं संपल्याची-