दिवसरात्र आणि सुखदुःख
आता दोन्ही सारखेच म्हणायचे..
खोटे, रंगीत मुखवटे सुखाचे
दिवसा उजेडात चढवायचे....
काळ्यामिट्ट रात्रीच्या अंधारात
आसवांनी धुवून काढायचे....
उद्या येणार्या दिवसासाठी मग
पुन्हा स्वतःला तेच समजावायचे..
खरे खोटे ठाऊक नाही,
पण फक्त या आशेवर जगायचे...
सुखाचा चढवलेला कच्चा रंग
खरंच चुकून कधीतरी
पक्का निघू दे....
अनेक आयुष्यांना
लागलेलं हे रोगट ग्रहण
कायमचे सुटू दे!
©️ मेघा विश्वास
-
भय इथले संपत नाही मज तुझी आठवण येते
मी संध्याकाळी गाते तू मला शिकविली गीते
ते झरे चंद्रसजणांचे ती धरती भगवी माया
झाडांशी निजलो आपण झाडात पुन्हा उगवाया
त्या वेली नाजुक भोळ्या वार्याला हसवुन पळती
क्षितिजांचे तोरण घेउन दारावर आली भरती
तो बोल मंद हळवासा आयुष्य स्पर्शुनी गेला
सीतेच्या वनवासातिल जणु अंगी राघवशेला
देऊळ पलिकडे तरीही तुज ओंजळ फुटला खांब
थरथरत्या बुबुळांपाशी मी उरलासुरला थेंब
संध्येतील कमल फुलासम मी नटलो शृंगाराने
देहाच्याभवती रिंगण घालती निळाईत राने
स्तोत्रात इंद्रिये अवघी गुणगुणती दु:ख कुणाचे
हे सरता संपत नाही चांदणे तुझ्या स्मरणाचे
ते धुके अवेळी होते की परतायाची घाई
मेंदूतुन ढळली माझ्या निष्पर्ण तरुंची राई
-- ग्रेस 🙏
-
तेरे इश्क़ में.. हाय तेरे इश्क़ में
राख से रूखी ,कोयले से काली,
रात कटे ना,हिज़्राँ वाली
तेरे इश्क़ में हाय..तेरे इश्क़ में..
तेरी जुस्तजू,करते रहे,मरते रहे,तेरे इश्क़ में..
तेरे रू-ब-रू,बैठे हुए,मरते रहे,तेरे इश्क़ में..
तेरे रू-ब-रू,तेरी जुस्तजू,
तेरे इश्क़ में,हाय तेरे इश्क़ में,
बादल धुने, मौसम बुने ,
सदियाँ गिनीं, लम्हे चुने ,
लम्हे चुने, मौसम बुने .
कुछ गर्म थे ,कुछ गुन्गुने,तेरे इश्क़ में..
तेरे इश्क़ में ..तन्हाईयाँ ..
हमने बहुत..बहलाईयाँ ..
तन्हाईयाँ,तेरे इश्क़ में
रूसे कभी,मनवाईयाँ
तन्हाईयाँ,तेरे इश्क़ में
मुझे टोह कर,कोई दिन गया
मुझे छेड़ कर,कोई शब गई
मैंने रख ली,सारी आहटें
कब आई थी,शब कब गई..
तेरे इश्क़ में ,कब दिन गया
शब कब गई ,तेरे इश्क़ में ..
दिल सूफ़ी ये था.. हम चल दिये..
जहाँ ले चला ..तेरे इश्क़ में
हम चल दिये...
-
जीवनरूपी वाळूवरती,
काळ उमटवी हळू पाऊले,
ऊरात उरले सुखदुःखाच्या,
आठवणींचे शंख शिंपले !
झाल्या गेल्या जमावजेची
स्वतःस कबूली देती झाले ....
विचारते मन पुन्हा पुन्हा मज
काय हरवले , काय मिळवले
सुचले काही सहजपणाने
अन् मलाच माझे हसू आले
मावळते सूर्यबिंब पाहून
एकच उत्तर मला मिळाले
जमाखर्च अन् प्रश्न उत्तरे
लाटे सोबत वाहुनी गेले
जमलेले ते शंख शिंपले
किनाऱ्यावरती सोडून आले !
हिशोब सारा ठाऊक त्याला
कां शोधा मग उगा उत्तरे
काळासोबत प्रश्न ही सुटतील
सोडून देता झाले गेले ....!
-- © मेघा विश्वास-
प्राक्तनी होते तुझ्या नि माझ्या
भेटच आपुली अशी घडे
आत्मिक सुंदर श्यामल कोमल
निळी मोहिनी अशी पडे.....
गोठूनी जावे ते सारे क्षण
संगे जे जे घालविले
उरात उरली तुझी स्पंदने
तुझे रूप मनी साठवले....
दैवाचा ना खेळ कळे
कुठले संचित असे जुळे
गतजन्मीची 'मीरा' रे मी
तुझ्यात मजला कृष्ण मिळे ....
©️ मेघा विश्वास-
कहने को धडक सा रहा है बस..
गिनते गिनते थक जाता है अब
अपनी ही अकेली धडकने...
जिनमे हर पल है ,
कितने सारे वादे, हमारी यादे,
लंबी रातें, हमारी बातें,
गुजारे हुए लम्हे, हमारे अधूरे सपने,
कुछ पहेलियाँ अनसुलझी सी....
कुछ सवाल जवाब अधूरे और उलझे से...
सब कुछ है .........
बस अब तुम नहीं हो 😰
©️ मेघा विश्वास
-
जळाच्या तळाशी, नभाच्या किनारी
निशेच्या उरी, गूढ अंधार रानी
स्फुरावे तरारुन,आत्म्यातूनी जे
तसे काव्य व्हावे,असे वाटते .....
झुगारुन देई, रुढी बंधने अन्
सळाळून वाहील रक्तातूनी
भिडावे असे थेट हृदयांतरी जे
तसे प्रेम व्हावे ,असे वाटते .....
मनातूनी पोहोचे, मनाच्या प्रवाही
बहरते जशी रोमरोमांतरी
कळावे जरी शब्द नसती जयाला
तशी साद व्हावे ,असे वाटते .....
नसे शब्द आणि नसे ज्यास भाषा
तरी वाटते गुणगुणावे असे
सूरांच्याही स्पर्शूनी जाई मनाला
तसे गीत व्हावे ......असे वाटते .......
©️ मेघा विश्वास-
नवी दृष्टी.... नवं क्षितीज ....
जुनेच जग....पण मिळावं जगण्याचं नवं गुपीत...!
नवी धडपड.... नवा ध्यास ....
जुनीच मी... पण व्हावे नवे भास ....!
पंख नवे...नवं आभाळ ....
जुनीच रात्र...पण व्हावी जिची नवी सकाळ....!
नवे रक्त, नवी आग...
जुनीच सारी स्वप्न....पण ज्याला असो नवी जाग....!
©️ मेघा विश्वास-
अस्वस्थशा उरात
काहूर एक वेडे
येताच जे समोरी
घातलेच कोडे....
होते अनोळखी मी
माझ्याच 'या' जगाला
शोधात उत्तरांच्या
होतात प्रश्न गहिरे ...
मौनात अर्थ सारे
हे खेळ कि 'नकोसे'
शोधीत गूढ वाटा
आता पुढेच जाणे....
©️ मेघा विश्र्वास-