Mayura Hardikar   (MANA)
1 Followers · 5 Following

Joined 22 April 2025


Joined 22 April 2025
24 JUL AT 17:11

आज दीप अमावस्या.
दिव्या ची पूजा.
माझा पहिला दिवा
माझा नवरा, कि जो मला कायम साथ देतो.
माझ्यासाठी त्याची प्रगती अखंड होऊ दे, हिच माझी पूजा.

दुसरा माझा दिवा
माझी मुलगी
जी मला कायम साथ देऊन
तिच्यातली मी
आणि माझ्यातली ती
कायम चांगल्या पद्धतीने
तेवत राहूदे.

अजून काही दिवे जे कायम माझ्या सोबत आणि माझ्या मनात कायम आहें त्याची अखंड प्रगती कर.
ह्या सगळ्या दिव्यची माळ मला आणि माझ्या घराला अखंड प्रकाश झोतात नेवू दे
हिच मानस पूजा आजच्या दिवशी 🙏

-


10 JUL AT 0:56

*गुरुपौर्णिमा*

"पूर्ण चंद्र जसा पूर्णत्वला नेतो"
तसंच माझ्या साठी *आजी* सगळं काही माझ्यासाठी.
*"निबंधची सुरुवात करून दे ना आजी"* मग मला खुप काही सुचेल, तसंच कायम तसंच व्हायचं.
सुरवात आजी नि करून दिली,
आणी *तिच्या सुरवाती* मुळे मी आज अखंड उभी आहें. इतकी वर्ष सरली, ह्या माझ्या *"गुरु"* मुळे मी अखंड प्रश्नांना उत्तर देते,मी लढते,न खचता, न थकता,कायम उभी राहीली आजी केवल तुझ्या मुळे 🙏तू माझ्या पाशीच आहें कायम.
अनेक पुस्तकातले धडे गुरुकडुन शिकावे आणि
आयुष्याचे धडे आई-वडिलांकडुन शिकावे,
अनूभवाची शिदोरी अन् मायेची ऊब मिळाली.
गुरुपौर्णिमेच्या मन:पूर्वक शुभेच्छा🙏

-


7 JUL AT 19:21

बघणाऱ्यांचा दृष्टिकोन बदला कि आपण पण बदलायचं असत.
चुका जास्त होऊ नये म्हणून आपणच सुधारायचं असत.
सगळंच होत नसतं आपल्या मनासारखा.
झुंबड मध्ये राहून पण राहायचं असत विरक्त,
क्षण जपायचे, क्षण हरायचे, क्षण जगायचे, आणी अंतला रडायचं असत.
बघणाऱ्यांचा चा दृष्टिकोन बदला कि
आपण बदलायचा असत.

-


5 JUL AT 16:01

जुन्या व्रणाना घेऊन जगतो आपण,
तेच बनती आपली ताकद.
आणी तेच बनती अश्रूची ओघळ.
व्रण बघुनी हसीतो आपण,
त्याच व्रणांनी दिला धोका कायम.
शेवटी व्रण तेच नशिबाचा भाग.
धोका असला तरी आहें खुप खास.
ज्या व्रणमध्ये रमली आहें मी आज,
तेच आहें खास, नजर नको लागायला हेच खास.

-


3 JUL AT 0:48

भेट
थेट भेट ठरवली कोणाला ना घाबरता.
ठेवला तुझ्यावर विश्वास अवीसमया.
अवर्णनिय तुझे माझे क्षण,
तुझ्या बाहू पाशेत, घट्ट तूझी माझी मिठी
भेट होऊनिया, जवळ जाऊनिया
ना बंध नुसता,तुझा नि माझा गंध
स्पर्षांतुनी,मायेतुनी, डोळ्यातूनी, फक्त तुझा गंध.
ह्या भेटूतुनी, दूर पल्यावर एकांतामधून भेटू पुन्हा एकदा ऐल तरी पैल तरी ,तेरी भेटू पुन्हा एकदा.
भेटू पुन्हा एकदा.

-


15 JUN AT 22:52

नजरेला नजर देत,
मनातल्या भावना जपत,
साथ देतोस तू मला.
तूझी साथ असताना मना तल्या गाभाऱ्यात आशीर्वाद देतोस मला.
स्पर्श तुझा असला तरी आत्म्याला साक्ष देतोस तू मला.
व्रण तुझा दिसला तरी हसरा करतो तू मला, मना च्या मना मध्ये जपताना किती वेगळा दिसतो तू मला.डोळ्याच ते तुझ बोलणं भावुक करत रे मला.

-


10 JUN AT 22:10

आजचा चंद्र पण जरा धूसरच दिसला, पौर्णिमा असून सुद्धा धूसरच दिसला, ही कमाल त्या निसर्गाची,आणी मनातल्या वादळाची होती, आज पूर्णिमा चा चंद्र धूसर दिसला.

-


6 JUN AT 0:08


किती सुंदर मृगजळ लांबवर जाताना.
जवळच्या क्षणाची साक्ष देत.
आभासी दुनियेत जवळ वाटावं असं आपलं माणूस. साक्ष देत असत काळजी घेणाऱ्या आपल्या माणसाची.
एकमेकांना आरश्यात बघताना,खऱ्या क्षणाची साक्ष देताना, नजरेतून खुणावताना, आणी ती स्मित रेषा येताना आपण दोघंच असतो.
स्वच्छ आणी खरं प्रतिबिंब दिसत असत,
आपण बघत असतो,छान वाटत असत.
न्याहाळात असतो,प्रेमात पडत असतो.
आपण दोघ असतो स्वच्छ प्रतिबिंब असत.
खऱ्या क्षणाची साक्ष देत असताना.
पण आपण दोघंच असतो.
आणी आपल्या दोघांमध्ये मात्र हें सगळं खरं असली तरी आपण दोघ काहीच नसतो
त्या क्षणची ती साक्ष तूझी माझी असली तरी
आपण बाकी सगळ्यांना जपत असतो.
म्हणूनच कि काय मृगजळ असणारा नातं
आभासी दुनियेत लांब जाताना दिसत.
किती ही जपलं तरी.

-


4 JUN AT 17:40

शेवटच्या पानाची आस
रोज व्यक्त होत असताना जशी ती आस असते.
तू येण्याची भास असते
तू दिसण्याची चाहूल असते
शेवटच्या पानाची आस असते
नखशिकांत तुझ्या मध्ये गेल्यावर ती असते निघताना मिठी ची ती शेवट ची आस असते आणी तीच शेवटच्या पानाची आस असते.
तुझा भास, तूझी आस, शेवटच्या पानाची आस!

-


21 MAY AT 15:59

क्षण येतो,
तो कधी तरी बघायला मिळतो,
क्षण कधी तरी अनुभवता येतो,
क्षण दुखावतो,
क्षण त्रास देतो,
क्षण क्षणिक आनंद देतो,
आणी त्याच क्षणाच्या बनतात आठवणी.

-


Fetching Mayura Hardikar Quotes