पहिला दिवस शाळेचा
सदैव आठवणीत राहणारा,
उत्सुकता मला खूपच
गणवेश शाळेचा घालायला.
नव्या कोऱ्या वह्या
अन् दप्तर माझ्या पाठी,
भांडणं झाली ताईसोबत
कारण नवं दप्तर फक्त माझ्यासाठी.
आवड मला अभ्यासाची
इतरांप्रमाणे मी नसणारा,
हास्य असे माझ्या गाली
मी मात्र सर्वांच्या आधी वर्गात बसणारा.- मयुर पाटील
26 JUN 2018 AT 12:36