विचारताच मी सखीला सखी नाही म्हणाली
प्रेम अबोल होते ती लापरवाही म्हणाली...-
दि.३/०९/२०२३
सांग सखे गाऊ कसा??
तुझ्या सुरांच्या मैफिलिंना
सांग सखे गाऊ कसा?
अडगळ झाली असेल कदाचित
ह्रदयात तुझ्या राहू कसा?
भरवश्यावर भरवसा ठेवायला आता
तुझा भरवसा राहिला नाही
शपथा वचने, भोळा चेहरा
असा कधी मी पाहिला नाही
लाठा अशा ज्या शांत झाल्या
सागराला ज्यावर गर्व होता
बेधुंद होऊनी असा किनारा
प्रीतीचा आपल्या तो पर्व होता
एक पर्व ते संपले आता
शब्दास शब्द जुंपले आता
भीषण युद्धाची आग काळजात
शांत आता राहू कसा?...
कवी:मारुती कांबळे,लातूर.8055281450
-
मन की बात है जो मन मे रह गई
दिल की तमन्ना थी,जो दिल रह गई
अब कहू की असान है सब कूछ करना
करने की बात थी कूछ और कर गई !
किसिके अरमान तो किसिके कसमे तूट गई
किसिने कहा की मेरी जायदाद लूट गई
कोई संभलता रहा जिंदगीभर रिस्तों का बोज
तो किसिके जिंदगी की मजबूत दोर तूट गई!
हा तुम नसिबवान हो लोग अब कहने लगे,
कंदेपर माथा रखकर अब बहने लगे !
एक कला है जो तुम्हे लिख ना आता है,
भावनाओं को शब्दो मे बिकना आता है!
अब कैसे कहू की हर कोई लिखनेवला
बिकाऊ नही होता!
दिल का दर्द समझनेवाला चेहरा
दिखाऊ नही होता!
- मारुती कांबळे (@maruti2299)
-
असे एकदा जगून बघ!!!
@@जगता आल पाहिजे नीट
आयुष्यात थोड होऊन धीट
दगडावरच्या प्रत्येक प्रश्नाला
उत्तर द्यावे बनुनी वीट...
@@फासे सगळे टाकून झाले
चमचे सगळे वाकून झाले
आता चाल तू ताट मानेने
चेले सगळे झाकून झाले...
@@एकदा तू युद्ध हो
विचाराचा तू बुद्ध हो
निराशेला टाक जाळूनी
मनाने तू शुध्द हो....
@@असे कैक येतील वाटे
पायाला मग रुततील काटे
फोड त्यांना असे फाटे
मग तुलाच तुझा अभिमान वाटे....
@@असे एकदा जगून बघ
बरसतील तुझ्यावर काळे ढग
डझनामधले आकरा जातील
राहशील फक्त एकटा नग...
- मारुती कांबळे,लातूर
-8055281450
-
चाहकर भी चाहत को चाहा नही जाता
छूप छुप कर देखणा रहा नाही जाता
सिद्दतोसे हमने की है मोहब्बत
हम भी मोहब्बत करते है,ऐसा कहा नही जाता
- मारुती कांबळे-
हल्ली उचकी लागायचं बंद झालय
कारण पाण्याचं प्रमाण ही आहे
आणि आठवण ही कोणाला येत नाही...
- मारुती कांबळे-
ओझेच का पाठीशी माझ्या
साद तुला देईन मी
खिडकीतला वारा तुला
भेटायला होईन मी....//धृ//
फुला फुलांचा गंध वेगळा
मला तुझा ग छंद वेगळा
मधु मक्षीचे पोळे जसे हे
प्रेमाचे हे जाळे तुझे
नात्यातला हा गोडवा
चाखायला देईन मी.....//१//
भास तुझे नवखे खरे
स्वप्न तुझे पाहीन मी
ध्यास तुझा पुरविन ग
घास तुला भरविन ग
घरटेच जरी छोटेच का
आकाश तुला देईन मी...//२//
नको नको ती वाट वेगळी
संसाराची आपुल्या सखे
शोधू आपण ती पहाट नवी
बाजूला सारून धुके
ऊन सावली ओलांडण्या
हात तुला देईन मी....//३//
- मारुती कांबळे,लातूर
मो.8055281450
-
*असे कित्येक क्षण हे आले*
*संध्या पुन्हा पुन्हा जगताना*
*अश्रूंना वाट मोकळी ही*
*चेहरा तुझा पुन्हा बघताना..*
*- -- के. मारी---*-
असावा जरी का तुझा छंद मजला
नको पाकळ्यांचा पुन्हा गंध मजला...
काटे जरी त्या फुलांशीच नाते
छळण्या तो वारा नको मंद मजला...
असशी जिवंत घड्याळात माझ्या
नको सेल छोटा असा बंद मजला...
जगण्यास आहे मला मी समर्थ
जगण्या तुझा तो नको फंड मजला...
मनाशी मनाचे अटळ युद्ध होईल
जगण्यातला तो नको बंड मजला...
नको अशी ती राख चीतेचीच माझ्या
भावनेची आग नको थंड मजला...
कवी:- मारुती कांबळे,लातूर.
मो.8055281450
-
सागर,समुंदर ,दर्या बता क्या क्या कहू तुझे
दिल,दिमाग,धडकन,बता कहा रखेगी मुझे...
- K.Marri's lines ...-