तुझ्या नावावर किती जमीन,पैसा आहे माहीत नाही..
पण!....
.
इथं कित्येक कविता, कित्येक रचना,
कित्येक शब्द हे फक्त तुझ्या आणि तुझ्याच नावावर आहे......
ते मी तुझ्या नावावर केले आहेत असं मुळीच म्हणणार
नाही मी कारण हे तुझंच आहे,
तुझ्याच "हक्काचं" आहे.
.
तुझ्या इतकी श्रीमंती तर मला कधी अजून कोणत्या श्रीमंत माणसात पण नाही दिसली....!
तुला माहित नाही पण...
"तू खूप श्रीमंत आहेस रे "
एवढं कोणीतरी वेड्यासारखं
आपल्यावर लिहुन ठेवणं...
यापेक्षा वेगळी "श्रीमंतीची"
व्याख्या नाहीये रे माझ्यासाठी तरी..... !
.
काव्यदिनाच्या माझ्या शब्दाच्या
खऱ्या साक्षीदाराला मनापासून
शुभेच्छा....
"प्रत्येक कवितेचा पहिला मान हा तुझाचं आहे"!
-
आयुष्यातील कविता..
मन💗 मानसी...
आयुष्यात जे काही आहे त्यात
समाधान मानायला शिकले बघ आता मी,
म्हणून तुला मी हसताना दिसत असेल बघ आता..
कारण तूच सांगितलं होतंस ना...
आयुष्यात जे आपल्याला पाहिजे ते सगळंच मिळत नसतं.
खरंच....तूच खरा होतास...!
Soo see...
I am Happy Now !
@man_mansi-
आयुष्यतल्या काही अवघड गोष्टी जिंकून पुढं गेलं की, काही काळानंतर ती गोष्ट सोपी बनते, मग ती आयुष्यतली कोणती पण गोष्ट असुदे, म्हणून आपण निवडलेल्या अवघड वाटा आपल्याला कधी पश्चाताप करून देत नाहीत.
man_mansi-
तुझ्या प्रेमात मरण्या-इतपत मी वेडी नाही
आणि माझं प्रेम तुला समजण्या-इतपत
तू शहाणा नाहीस.
@man_mansi
-
मला मरता आलं नाही तुझ्यासाठी...
आणि तू पण एकदा जगुन नाही
बघितलंस माझ्यासाठी...!
@man_mansi
-
मी वाचावी... माझं "भान" ठेऊन कविता,
अन् "भान" तुझं जागेवर नसावं,
.
.
मी हरावं नेहमी तुझ्यासाठी आणि
तू माझ्या कवितेपुढं हरावं...!
@man_mansi
-
तुझ्या स्वार्थी पणाच्या बदल्यात...,
तुझ्या खोटारडेपणाच्या बदल्यात...,
तुला देण्यासाठी...
माझ्याकडे फक्त प्रामाणिक
आणि खरं प्रेम होतं.....
पण तिथं तुझा स्वार्थीपणा "श्रीमंत" ठरला..
अन माझं प्रेम "गरीब"......
म्हणून तुझी ही उदारी मी आयुष्यभर
नाही फेडू शकत बघ...
@man_mansi-
आयुष्यातले सगळेच
"गैरसमज" कटू नसतात,
काही गैरसमज गोड पण असतात,
अगदी तुझ्या-माझ्या अन् आपल्या
नात्यासारखे...…."एक असा गैरसमज
की ज्यातून कधी बाहेरचं पडू वाटत नाही"...
नाही का??
@man_mansi-
तुला न सांगता तुझ्यावर
प्रेम करणं,
कधीतरी गुन्हा केल्यासारखा
वाटतो,
पण निमित्त काढून तुझ्याशी
बोलणं का होईना, त्यावेळेस...
तोच दिवस माझ्यासाठी ,
तू माझं प्रेम स्विकारल्या सारखा वाटतो..
@man_mansi
-
"आयुष्य खूप सुंदर आहे"
पण.....
आधी दुःखातुन चार पाऊल
चालून बघ !
@man_mansi-