चपल्ला-वरून एखाद्याची श्रीमंती
ओळखण्याची कला लोकांच्या
रक्तामध्येच असते ,पण बोलण्यावरून
मनाची श्रीमंती ओळखण्याची कला खूप कमी लोकांमध्ये असते!!!-
आयुष्यातील कविता..
मन💗 मानसी...
जगताना रोज मला
तुझ्यासाठी मरायचंय,
मरताना थोडया वेळ
मला तुझ्यासाठी जगायचंय,
रोज रात्री निजताना तुझ्या
अश्रुत भिजायचंय,
हे आयुष्य मला असंच
तुझ्या साथीनं पार पाडायचंय..-
आमच्या गरिबीची आहे आमची कविता
नको तुझ्या श्रीमंतीची तुलना त्या गरिबीशी
करू,तू नाही करणार कधी आमच्या गरिबीवर
कविता, आम्ही शंभर कविता तुझ्या श्रीमंती वर करू..-
मनाला पटत नसताना एकमेकांना
उगाचंच टाळणं,
विस्कटून साऱ्या आठवणी
परत सारं सावरणं,
सारचं नकोस होत रे तुझ्याविना
घुसमटून जगणं...-
विरहाच्या काठावर शब्द
माझे सांडले,
तू नाही आलास वेचायला
ते पुन्हा माझ्याशीच भांडले..-
ही सांज चांदण्यातली,
ही सोबत थंडीतली,
ही रात ओठांतली,
ही नशा तुझ्या कवितेतली ,
सारंच वेड लावत होती गं मला!!!
-
त्याच प्रेम जिथं संपल होत ,
माझ प्रेम तिथं सुरू झालं होतं,
मन त्याच हारल होतं,
पण माझं हृदय डाव जिंकल होत..-
संमक्ष आम्ही नाही भेटलो तरी ,
मी रोज त्याला शब्दरूपात भेटत असते,
गाठ घालून देतात ते शब्द आमची,
होण्या कुजबुज त्या दोन दिलांची...-
आज हे पत्र मला तुला द्यावं लागतं आहे कारण तू माझ्या पहिल्या प्रेमासारखा दिसतोस, आणि त्याला आता पत्र पोहचवण शक्य नाही त्यामुळे तुला देते, त्यानिमित्ताने का होईना माझ तुझ्याशी थोडं बोलणं पण होईल, बांधून ठेवलेल्या आठवणी आज तुझ्या पुढ्यात उघडते ,तुझी इच्छा नसेलच आठवणी उलगडन्याची पण तरीही मी पण तुला तेढ्याच हक्काने त्रास देणार आणि आज आठवणी उलगडणार, पाच वर्षांपूर्वी तारीख नाही लक्षात पण मे2014 मध्ये अगदी पहिल्या दिवसापासून सुरवात करते ज्या दिवशी मी तुला बघितलं त्या दिवसापासून च्या सगळ्या आठवणी माझ्या जवळ आहेत, सुरवातीला खरं तर मला तुझा राग यायचा,तुझं मला न्याहाळण मला सारखच खटकत राहायचं नक्की तुझ्या मनांत माझ्या विषयी चाललंय तरी काय कारण माझ्यावर तर कोण प्रेम वगैरे करण्यासारखी पण नाहीये मी मग उगाचंच बघत असलं पण नंतर मला पण त्या बघणाऱ्या नजरेची सवय झाली, पण नंतर समजलं ते प्रेम नाही तर तुला फक्त माझी दया यायची की एवढी शांत का बसते म्हणून तू मला बघायचा ,तुला खरं सांगायच झालं तर मी पहिल्या पासून अशीच आहे, शांत आहे मी पण फक्त तिथंच ज्या गोष्टी मला आवडतं नाहीत त्यांच्याशी मी कधीच संपर्कात राहत नाही,फुकटचा दिखाऊपणा करायला मला आवडत नाहीं आणि मला तसली लोकं पण आवडत नाहीत ,खूप खोटरडी असतात काही जण समोर एक आणि मागे एक बोलणारी आणि मला हे आवडत नाही मला भीती वाटते लोकांनी मला फसवण्याची ,कोणी फसवल्यावर
-
दोन प्रेमाचा वाढदिवस एकाच
दिवशी येणं याला पण नशीब च लागतं,
दोघेही Acting मध्ये कमाल बादशहा,
फक्त एक जण त्याची कला म्हणून करतो,
आणि एक जण फक्त माझ्यासाठी करतो!!
-