Manoj Dipak Swarge   (Manu)
15 Followers · 30 Following

Joined 23 June 2018


Joined 23 June 2018
22 MAR AT 21:41

एकाग्रता..‌
एकाग्रता शब्द वाचायला कठीण
आणि आचरणात आणायला देखील अवघड...
ज्याला एकाग्रता जमली...
त्याला जीवनात आनंदी रहाण्याची
गुरूकिल्ली लाभली..
... एकाग्र व्हावे.. स्वतःशी, अंतर्मनाशी..
... एकाग्र व्हावे वाचनात, जीवनात आणि जेवणात देखील..
एकाग्र व्हावे नात्यांशी, प्रेमाशी आणि त्यागाशी देखील..
एकाग्र व्हावे सुखाशी आणि दुःखाशी देखील..
- मनू

-


20 MAR AT 21:21

तुटलेल्या चहाचा कप देखील
इथे कोणी स्वीकारताना दिसत नाही..
मग तुम्हाला खचलेल्या, तुटलेल्या, निस्तेज
अवस्थेत कोण स्वीकारणार???
म्हणून स्वतःला कधी आणि तुटू देऊ नका..
मानसं येथील, मानसं जातील..
वर्षा मागून वर्ष सरतील..
मात्र तुम्ही खंबीर असणं आणि स्वतःला सांभाळून
हेच तेवढं सर्वात महत्त्वाचं आहे मित्रा!!!
- मनू

-


16 APR 2024 AT 9:05

उगवणारा प्रत्येक दिवस हा नविन असतो..
तो आपल्याला दिसतोय म्हणून आपल्याला त्याच महत्व नाही..
काल जे हे जग सोडून गेले..ते सांगतील..
ह्या दिवसाचं महत्त्व काय ते..
.... अर्थात..
आशा हेच जीवन!

-


15 APR 2024 AT 18:23

जर..तर..च्या विचारात..
हार तर आपलीच होते..
नको तो सोस,अन् ती व्यथा..
काळजात रूतणारी कट्यार पण..
आपलीच असते..- मनू

-


12 APR 2024 AT 22:20

शेवटी काय तर..
आपलं सुख -दुख सांगण्यासाठी, ऐकण्यासाठी हक्काची काही मानसं हवीतच..मग ते नातेवाईक असो..वा.. इतर कोणीही..
मानुस एकटा नाही जगू शकत़..हे कितीही नाकारलं तरी सत्य आहे..

-


4 APR 2024 AT 16:38

बरेच प्रश्न तसे विचारायचे राहून गेले..
तू हात हातात घेतलास..
आणि तूला काय सांगायचे होते..?
ते ही ऐकायचे राहून गेले..
-मनू

-


3 APR 2024 AT 19:54

प्रेम...
जे वेदना देतं..

-


1 APR 2024 AT 11:10

एक जागा ह्रदयाची...
निवांत,पडकी, कधीची..
तूझ्या असण्याची..
तुझ्या नसण्याची..

बोललो खूप..
पण तरी बोललोच नाही
छळला गेलो खूप..
पण तूला कळलो
कधी नाही..

एक जागा..
माझ्या लपण्याची..
जगा पलिकडे..
शब्दा अलिकडे ‌...
तुझ्यासह जगण्याची..
....एक जागा माझी लपण्याची

- मनोज स्वर्गे

-


29 MAR 2024 AT 23:24

रात्रीच्या समयी जो ..
जंगली प्राण्यांची अन्नाची काळजी घेतो..
तो सकाळच्या प्रहरी तुमच्या दिवसभरातील काळजीची सोय करणार नाही का?

-


29 MAR 2024 AT 23:10

Paid Content

-


Fetching Manoj Dipak Swarge Quotes