अपूर्ण स्वप्न आता खऱ्याखु-या अर्थाने पुर्ण झाले
रुसवे फुगवे संपून जगणे सहज सुंदर झाले.
त्यातल्या त्यात बऱ्याच गोष्टीचं ओझं रिकामी झालं
अतिशयोक्ती सोडून मन आता संयमी झालं
बऱ्याचश्या टोमण्यांचा फारसा फरक पडत नाही
आहेत्या परिस्थितीत जगण्याचा तोरा काय कमी नाही
जगण्याचं सुख हवं तसं माझ्या पदरी आलं
उशीरा का होईना पण आयुष्याला महत्त्व आलं
हीच ती साथ हीच ती सोबत मला हवी होती
त्यासाठी इतकी परिक्रमा होणारं याची कल्पना नव्हती
सदैव आहे सुखात आता नजर नको कोणाची लागायला
आहे आता सर्वकाही गरज नाही देवाकडे काही मागायला.
-
समोरच्याने काही नाही म्हटलं तरी
त्याच्या मनातलं समजायला पाहिजे.
नाती केवळ असून काय उपयोग
नात्यातला विश्वास कमवायला पाहिजे.
नुसत प्रेम करून काय फायदा
प्रेम शेवट पर्यंत निभवायला पण पाहिजे.-
आपण जे नाही ते दुनियेला
दाखवायला लोकांना
कस काय जमतं...?
स्वार्थ असला की निव्वळ
गोड बोलून काम करायचं
हे कसं समजतं...?-
दोस्तीचं नात सोबत संगत जपायला पाहिजे.
लागली कधी गरज तर मदतीचा खांद्यावर आधार पाहिजे
चुकत असेल कधी मित्राच तर,
मन मोकळेपणाने सांगितलं पाहिजे.
दुःख वाटून घेऊन संपणार नाही पण
त्यावर आशेचा किरण म्हणून निर्णय दिला पाहिजे
दारू पिऊन सुटत असतील सर्व प्रसंग किंवा प्रश्न
तर स्वतः सहित घरच्यांना देखील पाजली पाहिजे
मित्राला दारू पिण्यापासून रोखू नाही शकत
तर निदान त्याच्या सोबत बसून पियायला तरी नाही पाहिजे
दोस्तीतल्या दोस्ताला किमान जगणं शिकवायला पाहिजे.
निव्वळ सोबत राहून मित्राच्या आयुष्याचा बाजार
तरी नाही केला पाहिजे.-
शोधते मी त्या स्वप्नांना,
जी मनात ठेवून तुझीया सोबत आली .
विझल्या त्या मशाली अन् ...काय रे देवा?
ही माझ्यावर अशी वेळ आली.
तडफडते मी , तळमळते मी ,
देवूनी स्वतःला स्वतःची तिलांजली.
एक निर्णय चुकला अन्
झाली आयुष्याची राखरांगोळी.....
हसूनी लपवते दुःख सारे
ऐकू येते स्पष्ट वेदनांची आरोळी.
आप्तेष्टांच्या आठवणी मनाच्या कोपऱ्यात ,
भेटी लागत आहेत सदैव माझ्या जिव्हाळी.-
तुला पाहिलं अन्
मनात काहूर दाटलं,
या देहाला प्रेम होऊ शकतं
अस पुन्हा वाटलं.-
माझ्यातलं जे आहे ते समजून घे,
तुझ्यातला ते तसं मी समजून घेतो.
संमजून समजण्यापेक्षा समजत समजत संपूर्ण समजून घे.
समजण्याच्या पलीकडे न समजता मी तुला उमजून घेतो .-
Wajah koi khas nahi
Mitla hai sab ko kuch na kuch
Khas avsar par.
Jald kuch Mila nahi
Kyuki bhagvan bhi chahata tha .
Dedu ise kuch khas muhurat par.-
Tere husn ko kisi ki najar na Lage.
Tuz se jalne Wale Khudbakhud jal Jaye.
.-
Is kambakht jindgi ki aadat hai muze.
Ulzano me ulzi meri dasta kubul hai muze.-