सवयी बदला ! वेळ बदलेल !
-
लेखक..
शिवनटराजाचा सेवक आणि सरस्वती पुजक...
शब्दांचा प्रियकर...✍❤
Msdian's🏏🧿🇮🇳 read more
जय हिंद!
एखाद्या शत्रूला त्याच्या लायकीत कस ठेवायचं हे आपल्या भारतीय सैन्याकडून शिकावं!-
पहलगामचा आक्रोश"
© महेश मधुकर चव्हाण – सर्वाधिकार राखीव
पहलगामच्या कुशीत आज पुन्हा रक्त सांडले,
निष्पाप स्वप्नांचे तुकडे धरणीवर रडले.
शांततेच्या वेलीवर दहशतीने आघात केला,
मानवतेच्या कपाळावर काळा डाग उमटवला.
आभाळही दुःखाने गहिवरले, वीजा रडल्या,
शौर्याच्या मातीत वीरांची शपथेची फुलं फुलली.
दहशत पेरणाऱ्यांनो, हे लक्षात ठेवा,
भारत शांत आहे, पण विस्फोटकही तेवढाच आहे.
एक एक थेंब रक्ताचा हिसाब मागेल,
सहनशक्तीच्या पलिकडे आता ज्वाळा भडकतील.
पहलगामच्या हुंकारात एकच गर्जना,
आम्ही माफ करणार नाही — फक्त न्याय करणार!-
पहलगामवर हल्ला म्हणजे शांततेवर घाव आहे,
हिंदुस्थान माफ करणार नाही हाच अंतिम जवाब आहे!-
गुढी उभारू, सण साजरा करू,
नव्या वर्षाचे स्वागत करू,
यश-समृद्धी लाभो जीवनाला,
सुख-शांती लाभो परिवाराला!-
मृत्युंजय अमावस्या ⚔
धर्मासाठी झाला रणसंग्राम,
संभाजी राजे अमर झाले नाम।
छाटले तन, ना थांबले प्राण,
शौर्य गातो आजही हिंदुस्थान॥-