नशेत राजा नशेत सेना
भ्रमात खोट्या जमाव आहे-
प्रत्येकाला व्यथा आहेत
न सुटणारे प्रश्न आहेत
टीचभर आनंदासाठी
म्हणूनच सारे जश्न आहेत
-
कवेत असलं आभाळ
तरी घट्ट मातीशी नाळ
यशाची चढती कमान
आपले मातीशी इमान
असतील अनेक थोर
वंद्य सदा माऊलीचा पदर
जपले मनामनाचे बंध
धुंद नात्यांचा धुंद सुगंध-
वाचाळवीर नेते, जमलेत, भोवताली
सत्तेतले विरोधी, उरला, कुणी न वाली
-
Fog will not remain forever
Stop & Wait ...
Sun will shine again
Storm will not remain forever
Stop & Wait ...
Everything will be fine again
-
इथे प्रत्येक ठिकाणी
हा विषाणू वेगळा आहे
तक्रार द्यायची कुठे माशांनी
ज्यांचा मालक बगळा आहे
-
दोन शब्दातही प्रेम आहे
मौन ओठातही प्रेम आहे
थापते माय त्या भाकरीच्या
चार घासातही प्रेम आहे-
एक शेर ....
जखम आज इतकी सुगंधी कशी ?
पुन्हा वार केला.. फुलांनी जणू-
बीच भंवर छोड गये वो
जिनके बडे बडे नाम थे
डुबने ना दिया दोस्तो ने जो
जमाने की नजर में नाकाम थे
-
पोटभर जेवायलाही वेळ नाही
दोन क्षण बोलायलाही वेळ नाही
काय किंमत दाटल्या त्या भावनांना
व्यक्त जर का व्हायलाही वेळ नाही
प्रेम जुळले लग्न झाले पण अताशा
हात हाती घ्यायलाही वेळ नाही
बाप म्हणजे जन्मभर आधार होता
त्यास खांदा द्यायलाही वेळ नाही
जीवलग गावात आला आज माझ्या
एकदा भेटायलाही वेळ नाही
गुंगलो लिहिण्यात इतका काय सांगू
चांगले वाचायलाही वेळ नाही-