Mahesh Malewale   (महेश)
23 Followers · 6 Following

read more
Joined 10 July 2018


read more
Joined 10 July 2018
13 DEC 2020 AT 1:48

कदाचित क्षितिजापलीकडे
तुझं 'वास्तव्य' असावं...
मावळत्या सूर्याची त्या अथांग
सागराशी 'भेट' होतेच ना
'आभासी' का असेना!
असो भेटीचं...
पण, हा मेलोमैली प्रवास
अजून करणार तर किती?
'ते वास्तव्य' शोधण्यास..
कल्पनेच्या विश्वात रमलेल्या
मनास कळत नाहीये...
'ही वाट' माझं स्वप्न आहे की
स्वप्नातली ही वाट आहे!

-


16 NOV 2020 AT 0:45

समस्यांच्या वादळाने घेरलंय
परी, हटलो मी नाही |

जीवनवाटेवर थांबलोय थोडसं
परी, थकलो मी नाही |

काचेचं मनही टिचलंय
परी, खचलो मी नाही |

बोलण्यास विराम झालाय
परी, भुललो मी नाही |

विरहाच्या कम्पाने हादरवलंय
परी, दडलो मी नाही |

नात्यांच्या गुंत्यात गुरफटलोय
परी, बदललेलो मी नाही |

-


20 OCT 2020 AT 0:01

अठराविश्व दारिद्र्याची अन मरत मरत
जगण्याची ही एक कथा आहे
चहावल्याच्या देशात तडफडणाऱ्या बळीराजाची
ही निःशब्द अशी व्यथा आहे ||

घामाची शेती करत अपेक्षांचं बियाणं
मी नेहमीच लावत आलो. पण,
नशीब पावसापरी धो-धो बरसलं
अन मी पीकापरी बरबाद झालो ||

पाण्यानं विझत असतीलही गोष्टी.....
परी, यावेळेस पावसानं मनासहित
अख्ख रान जळून गेलंय
निवडुंगापरी काट्याचं अन रक्ताळलेल्या वाटेचं
अंधारलेलं आयुष्य मला कळून गेलंय ||

आजही,भुकेचे डंख खात
अर्ध्या पोटी झोपतांना मला उद्याचा वेध आहे
सूर्यास्त झालाय आजचा अन मज
चंद्राच्या भाकरीचा शोध आहे ||

-


11 OCT 2020 AT 0:41

" तू आणि पावसाची सर.."

दोघेपण दिलासा देणारी..
अगदी स्वच्छन्दपणे बरसणारी..
स्मृतींच्या ग्रीष्मास तृप्त करणारी..
जाणीवेच्या वेदना मुक्त करणारी..

कधी अचानक तर कधी सांगून येणारी..
कधी मनास नाराज तर कधी फुलवणारी..
चातकापरी चित्तास वाट पाहायला लावणारी..
कधीपण आलात तरी मनाला हेलावून वेड लावणारी..

पुनःश्च ओझरत्या भेटीची आस लावणारी..
प्रत्येक्षात नव्हे तर स्वप्नातही भास होणारी..

-महेश

-


7 OCT 2020 AT 0:33

तू....
मनाच्या किनाऱ्यावर स्थिरावलेली नाव तू
ओबडधोबड शब्दांमागील निरागस भाव तू
भटकलेल्या वाटसरूच्या स्वप्नातील गाव तू
हृदयी उमटलेल्या जखमेचा घाव तू
घननीळ सागराच्या क्षितीजाचा आभास तू
मरत मरत जगणाऱ्या जीवनाचा वनवास तू
कर्णमधुर संगीतातील निरागस राग तू
सरणावर जळणाऱ्या चित्ताची आग तू
काळ्याभोर नभी झळकणारा शुक्राचा तारा तू
हसऱ्या चेहऱ्यामागील दडलेल्या अश्रूंच्या धारा तू
स्वप्नातच बहरणारी विलक्षण प्रीत तू
जिंकूनही हरवणारी जगण्याची रीत तू

-


22 JUL 2018 AT 23:00

आयुष्यातील बऱ्याच समस्यांची कोडी
कितीही सोडवली तरी सुटत नाहीत..
कधीकधी ती 'सोडून दिली'की
आपोआप सुटायला लागतात..

-


21 JUL 2018 AT 12:16

कॉफी आणि बरंच काही..

-


20 JUL 2018 AT 20:40

जिंदगी मे 'चार' आदमी
तो जोडने चाहीये..
'आखीर'मे काम
आते है!

-


19 JUL 2018 AT 22:58

माणुसकीची भूल पडत
असलेल्या या दुनियेत पैशाबरोबर
'निस्वार्थी प्रेमाला'
आम्ही मोजताना पाहिलंय!

-


18 JUL 2018 AT 23:46

'उजेडात' तर सगळेच सोबत असतात..
अंधारात 'सावली' सुद्धा साथ सोडून जाते..

-


Fetching Mahesh Malewale Quotes