येथल्या दरीदरीत हिंडते मराठी
येथल्या वनावनात गुंजते मराठी
येथल्या तरुलतात साजते मराठी
येथल्या कळीकळीत लाजते मराठी !!
येथल्या नभामधून वर्षते मराठी
येथल्या पिकांमधून डोलते मराठी
येथल्या नद्यांमधून वाहते मराठी
येथल्या चराचरात राहते मराठी !!
पाहुणे जरी असंख्य पोसते मराठी
आपुल्या घरात हाल सोसते मराठी
हे असे कितीक खेळ पाहते मराठी
शेवटी मदांध तख्त फोडते मराठी !!
कविश्रेष्ठ, कविवर्य
सुरेश भट
मराठी भाषा दिवस-
*लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी*
लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी
जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी
धर्म , पंथ , जात एक जाणतो मराठी
एवढ्या जगात माय मानतो मराठी !!
आमुच्या मनामनात दंगते मराठी
आमुच्या रगारगात रंगते मराठी
आमुच्या उराराउरात स्पंदते मराठी
आमुच्या नसानसात नाचते मराठी !!
आमुच्या पिलापिलात जन्मते मराठी
आमुच्या लहानग्यात रांगते मराठी
आमुच्या मुलामुलीत खेळते मराठी
आमुच्या घराघरात वाढते मराठी !!
आमुच्या कुलाकुलात नांदते मराठी
येथल्या फुलाफुलात हासते मराठी
येथल्या दिशादिशात दाटते मराठी
येथल्या नगानगात गर्जते मराठी !!-
पाटलांचा विश्वास
पाटलांचा विश्वास हाय !
म्हणून लेखणीला सत्याची धार हाय !
पाटलांचा विश्वास हाय !
म्हणूनच इतिहासाचा इतिहासावर विश्वास हाय !
पाटलांचा विश्वास हाय !
म्हणुन इतिहासाला मोकळा श्वास हाय !
पाटलांचा विश्वास हाय !
घरोघरी इतिहास पोहचवनं हाच ध्यास हाय !
पाटलांचा विश्वास हाय !
म्हणुनचं तिथं सरस्वतीचा वास हाय !
पाटलांचा विश्वास हाय !
म्हणुनच काहीतरी करण्याचं धाडस हाय !
पाटलांचा विश्वास हाय !
म्हणुनच गावच नाव जगाच्या नकाशात हाय !
पाटलांचा विश्वास हाय !
गावाला पण त्याचा अभिमान हाय !
गावाला पण त्याचा अभिमान हाय !-
पांढरा पेशा!
चेहऱ्यावर दिसल्या त्यांच्या चिंतेच्या रेषा
''दिसतं तसंच'', असल्यावर पांढरा पेशा !
मावळल्या त्यांच्या "त्या" आशा
आता करायच्या पूर्ण "त्या" कशा !
ते दाखवतात जगाला आशा
बाता मारणं हाच त्यांचा पेशा !
होणार पूर्ण कशी महत्वकांक्षा
येणार आता पदरी घोर निराशा !
दाखवतील एक एक नकाशा
पुन्हा करतील हळूहळू तमाशा !
पूर्ण नाही केल्या तर अपेक्षा
नंतर बसाव्या लागतील मारत माशा !
चेहऱ्यावर दिसल्या त्यांच्या चिंतेच्या रेषा
''दिसतं तसंच'' असल्यावर पांढरा पेशा !
-
विझलो जरी आज मी
विझलो जरी आज मी,
हा माझा अंत नाही…..
पेटेन उद्या नव्याने,
हे सामर्थ्य नाशवंत नाही…ll
छाटले जरी पंख माझे,
पुन्हा उडेन मी.
अडवू शकेल मला,
अजुन अशी भिंत नाही ..
माझी झोपडी जाळण्याचे,
केलेत कैक कावे..
जळेल झोपडी अशी,
आग ती ज्वलंत नाही..
रोखण्यास वाट माझी,
वादळे होती आतूर..
डोळ्यांत जरी गेली धूळ,
थांबण्यास उसंत नाही..
येतील वादळे, खेटेल तुफान,
तरी वाट चालतो..
अडथळ्यांना भिवून अडखळणे,
पावलांना पसंत नाही.
कविश्रेष्ठ
सुरेश भट-
चुकीच्या प्रवाहाच्या किंवा अपप्रवृत्तीच्या विरोधात समाजाला तत्वज्ञान किंवा विचार सांगता आणि कालांतराने तुम्ही ही त्याच प्रवाहात किंवा अपप्रवृत्तीच्या लोकांत सहभागी होता, अशा वेळी अर्थहीन होतं ते तत्वज्ञान आणि विचार... विश्वासार्हता रसातळाला जाते.......
-
उशीर
हेही असेच होते, तेही तसेच होते
आपापल्या ठिकाणी सारे ससेच होते!
केले न बंड कोणी.. त्या घोषणाच होत्या!
ज्यांनी उठाव केला तेही घसेच होते!
आला न गंध त्यांना केव्हाच चंदनाचा..
सारे उगाळलेले ते कोळसेच होते!
तू भेटलीस तेव्हा मी बोललोच नाही!
तू भेटतेस तेव्हा माझे असेच होते!
होती न ती दयाही.. ती जाहिरात होती!
जे प्रेम वाटले ते माझे हसेच होते!
झाला उशीर जेव्हा हाका तुला दिल्या मी.
मातीत पावलांचे काही ठसेच होते!
(एल्गार)
कविश्रेष्ठ सुरेश भट-
लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, जाहले खरेच धन्य ऐकतो,मराठी धर्म पंथ जात एक जाणतो मराठी, एवढ्या जगात माय मानतो मराठी
पाहुणे असंख्य पोसते मराठी, अपुल्याच घरात हाल सोसते मराठी, हे असे कित्येक खेळ पाहते मराठी, शेवटी मदांध तख्त फोडते मराठी.
कविवर्य- सुरेश भट-
समजावुनी व्यथेला समजावता न आले!
समजावुनी व्यथेला समजावता न आले!
मज दोन आसवांना हुलकावता न आले!!
सर एक श्रावणाची आली निघुन गेली!
माझ्या मुक्या ञुषेला पण बोलता न आले!!
सुटला कधी न जो मी मज घातला उखाणा!
माझ्याच उत्तराला मज शोधता न आले!!
चुकवुनही कसा हा चुकला न शब्द न माझा!
देणे मलाच माझे नाकारता न आले!!
लपवीत गीत माझे पळ काढला तरीही!
ह्रुदयांतल्या विजांना झिडकारता न आले!!
केले जरी खुलासे मीही नकोनकोसे!
जगणे अखरे माझे मज टाळता न आला!!
- कविवर्य सुरेश भट-