कविराज धनंजय देशमुख   (©कविराज...(धनंजय))
553 Followers · 141 Following

read more
Joined 21 March 2019


read more
Joined 21 March 2019

एक वादळ असंख्य विचारांचं
डोहात मनाच्या घोंघावत असतं
शांत त्याला करण्याचा असतो प्रयत्न
पण विचारांचं चक्र काही थांबत नसतं...

महापूर देखिल असतो बर्‍याचदा
तात्विक सोडून कुंचल्या विचारांचा
नसते भान उगाच कधीतरी
ठेकाही चुकतो कित्येकदा हृदयाचा...

हुलकावणी त्यास द्यावी कितीदा
कितीदा विणवावे वादळास मनाच्या
पाठमोरे होती काहीकाळ ती
अन् क्षणात उसळती कड्यात नयनाच्या...

-



नाही कळे कोणा दुःख
नाही सांगे कोण काही
माझी व्यथा माझी आहे
कोणी माझा येथे नाही..

कोणा पुढे जावे कसे
डोळे घेऊन हे ओले
हसू ओठावरी येते
खोटे खोटे गोड बोले..

सांजवेळी रवी नभी
जाई सागर तळाशी
राती काळ्या आवसच्या
चंद्र नसे तो उशाशी..

उरी दुःखाचे विस्तवं
त्याची नाही कोणा जाण
कोण करील सोबत माझी
अंगी नाही अवसान..

-



जगलेल्या क्षणांनी
पुन्हा भेट द्यावी फिरून एकदा
न्यावे त्याच वाटेवर माघारी
अन् द्यावे नवे आयुष्य फिरून एकदा...

सुकल्या पाकळ्यांनी
उमलावे पुन्हा फिरून एकदा
द्यावा तोच गंध मनास या
अन् व्हावे कळी त्याने फिरून एकदा...

व्यक्त व्हावे शब्दांनी
कागदावर कोऱ्या फिरून एकदा
भावना मनातल्या मांडाव्या
अन् पुसावे अश्रू फिरून एकदा...

जगलेल्या क्षणांनी
हाक द्यावी मला फिरून एकदा
द्यावे दान आयुष्याचे पुन्हा
अन् पदरात टाकावे जगणे फिरून एकदा...

भरावे आयुष्य कवितांनी
करून शब्दांची सोबत फिरून एकदा
वेदना, यातना मनातल्या भावना
अन् सारेच मांडावे पानावर फिरून एकदा...

-



तुझ्या माझ्यातले अंतर जेंव्हा जेंव्हा वाढत गेले
सूर आठवणीचे तुझ्या अजुनच चढत गेले...

-



गालावरची खळी तुझ्या
आहे तशीच आहे अजुनही
चंद्रकोर भाळी तुझ्या
दिसते सुंदर त्या चंद्राहूनही...

का कुणास ठाऊक कसे
आज नजरेत तुझे रूप आले
जागल्या सार्‍या आठवणी जुन्या
अन् उतरून अश्रू गाली ओघळले...

-



शोध कुठे घ्यावा तुझा, कळले न मला.
का हरवलोय मीच कुठे, समजले न मला.

येण्याआधी तुझ्या, खंत नव्हती कसली.
पेटल्या कधी उरात, प्रेमज्वाळा कळले न मला.

बरसणार्‍या सरी सांगून गेल्या कालच्या.
पण शब्दांनी मुक्या, काही समजले न मला.

बाभळीच्या झाडाखाली, निजलेली पाखरे.
अंत कसा त्यांचा झाला, उमगले न मला.

कुणी सांज केली, सुंदर कातरवेळी.
चांदणे नभी जन्मलेले, दिसले न मला.

प्राजक्तही पसरलेला, शांत भासला रात्री.
वार्‍यावरचे अस्तित्व त्याचे, कळले न मला.

अबोल प्रीत माझी, तुझ्याही हृदयात.
मुके भाव तुझे ओठातले, उमगले न मला.

-



काही उत्तरं द्यायची असतात
काही उत्तरं मिळवायची असतात
असंख्य प्रश्न उभे पुढ्यात जरी
काही उत्तरं विसरायची असतात...

काही उत्तरं मिळत नसतात
काही उत्तरं नकळत मिळतात
अस्तित्वाच्या लढाईत मात्र
काही उत्तरं हरवायची असतात...

काही उत्तरांना प्रश्नच नसतात
तर काही प्रश्नांना उत्तरेच नसतात
तरीही प्रयत्न करतच राहायचं
असेही काही प्रश्न-उत्तरं असतात...

काही उत्तरं आयुष्य घडवतात
काही उत्तरं आयुष्य बिघडवतात
तरीही उमेदीने जगत राहायचं
प्रश्न उत्तरं काही संपत नसतात...

उगाच प्रश्न उत्तरात पडायचं नसतं
क्षणाचं आयुष्य क्षणात जगायचं असतं
लाख येऊ द्या वादळे जीवनात
तरीही मात्र आपण तटस्थ राहायच असतं..

-



असंख्य भावना माझ्या
सांग ना तुला कशा कळतात
नाही स्मरणात काही तरी
आठवणी तुला कशा स्मरतात...

होऊन प्रेरणा आलीस जीवनी
एक ओळ नि चारोळीच्या रूपातून
कडव्यांनी कडवे वाढवत गेली
बहरली तू माझ्या प्रत्येक शब्दांतून...

निमित्त मात्र दिवस आजचा
एक चॉकलेट तुझ्यासाठी म्हणण्याचा
खरंतर तुझ्यातच आहे गोडवा
शब्दातून माझ्या सुंदरसं काव्य करण्याचा...

सखी तू, प्रेयसी तू माझी
तूच या जीवनाची सहचारिणी
सोबत तुझी अशीच लाभावी
भेटणाऱ्या मला त्या कैक जीवनी...

-



गुलाब पाकळ्या मऊ कोवळ्या
किती लाजर्‍या छान उमलल्या
गंध देऊनी वार्‍यास सारा
मिठीत तुझ्या त्या येऊन विसावल्या...

प्रीत माझी तुझिया उरी
असू देत माझ्या फुलपाखरा
देईन सुगंध सोडून गंध
माळून तुझ्या केसात गजरा...

अत्तर गंध केवड्याचा
देहातून सखे तुझ्या दरवळला
न सांगताच भाव मनीचा
सांग कसा ग तुला तो कळला...?

आलो तुजपाशी आज सखे मी
गुलाब गुलाबी तुला द्यावया
पसरून बाहू मिटवून डोळे
मिठीत माझ्या या तुला घ्यावया...

करशील स्विकार गुलाबासवे माझा
आहे बाळगून हीच उरी आशा
न बोलताही कळेन का तुला
मुक्या माझ्या या मनाची भाषा...

-



फुलासारखे आयुष्य हे
फुलाप्रमाणेच जगून घ्यावे
नाही उरलो स्वतःसाठी जरासे
तरी मात्र कायम जगाचे व्हावे...

( पूर्ण कविता खाली caption मध्ये 👇)

-


Fetching कविराज धनंजय देशमुख Quotes