प्रेमाच्या लाटेत
विरहाच्या सागरात
नौका बुडाली
अश्रूंची आठवात
ओसाड पडला
आयुष्याचा किनारा
अनाथ झालो मी
नाही मिळाला सहारा
रेतीच्या वाळवंटात
राहिल्या भुतकाळातील
पाऊलखुणा प्रीतीच्या
उमटलेल्या प्रेमातील
एकच ठेंगणी जीवनातील
उद्ध्वस्त करून गेली
देहाच्या निखाऱ्यावर
ती प्रेम निशाणी मेली
-
कविता माझी सांगते
मनातले भाव मांडताना,
विरहाचे दुःखे आठवणीतले
पुन्हा नव्याने कसे गुंफायचे....!
डोळ्यातील वेदनेची गाथा
हुंदका घेत कागदावर कशी लिहायची
अबोल झालेले शब्दांचा....!
आधार घेत गुलाबाच्या सुंगधाप्रमाणे
जरी काटे ह्रदयात टोचले असले तरीही
फुलांच्या गंधाप्रमाणे दरवळले पाहिजे,
ओल्या भावना मांडताना...!
वाचकांला वाटले पाहिजे की
हेच दु:ख माझे तर नाही ना...!
कविता माझी सांगते पुन्हा मला
शब्द पेर मनातले गालात हसून
मनाची कहाणी मनाला सुचवत
वहीची पाने भरून जाऊ दे प्रेमाने
प्रेम हे जगातील सुंदर व्याख्या आहे
कविता माझी सांगते मला
प्रेम व्यक्त कर शब्दातून प्रेमिकांसाठी
कविता माझी सांगते मला प्रेमाचे शब्द......!
-
प्रेमात पडले मी तुझ्या साजणा
सांग ना कधी कळणार तुला?
भाव माझ्या मनातला,
अबोल प्रीत तुला कळेना....!!
कसे सांगू मला समजेना
जुळले का कधी
तुझे आणि माझे नाते....!!
या प्रेमवृक्षवेलीवर
प्रेमाचा गुलाब घेऊन हातात,
वाट पहात आहे तुझी
सुगंध दरवळला प्रीतीचा....!!
बेधुंद करतोय मला
मन बघ ना किती पाखरू ,
भास होतोय सारखा तुझा
समोर मला तुच दिसतोय
हा कसला रे अभास
सांगशील का मला?...!!
नको छळू असे मजला
नाही कळणार तुला माझी प्रीत,
बोल ना सांग कधी कळणार तुला ?...!!
-
प्रेमाची नौका कशी बुडाली?
कळली नाही अधीर मनास
विरहाच्या सागराला भरती आली
वादळेची जखमा झाल्या ह्रदयास...!
आज पुसल्या जरी लाटांनी
किनाऱ्यावरच्या पाऊलखुणा
आठवणीत राहिला कायम
तिने प्रेमाने लावलेला चुना...!!
वेदनेचा झरा वाहत होता
डोळ्यात स्वप्ने सजलेली
अधूरी राहिली जीवनात
एकमेकांच्या मिठीत पहायलेली..!!!
शोधत होते मी तिला इकडे तिकडे
अचानकच समोर मला ती दिसली
पाहताच क्षणी दोन मिनिटे स्तब्ध झालो
अबोल नयनी लाचार ती मला भासली..!!!!
सागरास जशी नदी मिलनास
अतूर असते तशी मला वाटली
समोर मी दिसताच लाजून
ती माझ्या गळ्यात येऊन रडली...!!!!!
-
तुझ्या माझ्या मैत्रीचा आरसा
पारदर्शक, एक अतुट विश्वासाचं
नात जिव्हाळ्याच, ऋणानुबंधनाच
जसं काही राधाकृष्णा सारख प्रेमाचं
एकमेकांच्या सहवासात असताना
बोलताना, भांडताना नकळतच शब्द
टोचले तरीही ह्रदयाच्या काचेला
तडा न जाऊन देणारी मैत्री असावी निशब्द
आपुलकीच्या भावना मनात
दोघांच्याही लपलेल्या असाव्यात
आयुष्याच्या पाऊलवाट चुकल्यावर
हात हातात घेऊन प्रेमाने सांभाळाव्यात
अशी समजून घेणारी मैत्रीची
साथ तुझी मला लाभली
प्रेमाची सावली मला मिळाली
मैत्रीच्या कुशीत मी आज सुखावली-
आज मला काहीच कळेना
का डोळ्यात येते पाणी?
आयुष्याच्या प्रत्येक वळणावर
साथ मला तुझी लाभली होती
अचानकच असे काही घडले...!
हात कायमचा धरलेला
नकळतच सुटत गेला
विश्वास नावाचं पात्र
कधी अविश्वासात बदल झाले
कळलेच नाही भोळ्या भाबड्या मनाला
नाही दिसल्या कधी तुला माझ्या
आसवांच्या भावना दवात भिजलेल्या
हे अश्रू फक्त तुझ्यासाठी
वाहत आहे आपल्या प्रेमासाठी ....!!!
पावलांची चाहूल कानी ऐकू येते
आठवणींची झुळूक ह्रदयाला
स्पर्श करून छेडून जातात भावनांना
नको वाटतोय हा भास
मृगजळाशी खेळायचच बंद केले आहे
खोट्या स्वप्नांनाच्या आभासाने
त्रास होत खूप मनाला..
-
जगाच्या पाठीवर कुठेही जा
तुला माझी आठवण
आल्याशिवाय राहणार नाही
नेहमीच रहाणार हृदयात साठवण
स्वप्न नयनात रंगवलेले
जाशील जिथे तिथे
तुझ्या नजरेला मीच दिसेल
शोधशील मलाच तू जिथे जिथे
नाही दिसणार पुन्हा
कधी तुला आयुष्यात
अस्तित्वातच संपलेले
असेल माझे या जगात
होतील वेदना तुझ्या ह्रदयाला
नको रडू तू माझ्यासाठी
जगाच्या पाठीवर कुठेही राहा
फक्त सुखी रहा स्वतःसाठी
-
येतोस तू माझ्या स्वप्नात
मोहक तुझे स्मित हास्य
मनास स्पर्श तुझा भासतो
सांग ना कोणते आहे हे रहस्य ?
नको दूर जाऊ असा हात सोडून
चंद्र बघ खिडकीतून डोकावतो
स्वप्न झुल्यावर तुझी आठवण
काढून बघ कसा मला चिडवतो
काळ्या लाटेवर चांदणी विसावली
काजव्यांच्या प्रकाशात रातराणी
रात्रीच्या कुशीत अलवार शहारली
एकमेकांच्या मिठीत स्वप्नील सुमनांनी
प्रीत अनामिक असे तुझी साजणा
भेट आपली प्रथम आजही स्मरते
दूर तू असा लागे मनास हुरहूर
सख्या मन माझे तुझ्यासाठी झुरते
-
आठवणींची नदी
ओसांडून वाहते
अश्रूंच्या थेंबात
यातना सलते
गुंफले भाव
शब्दात मनाचे
बीज पेरले
ह्रदयात दु:खाचे
फसवे फासे
सगळे मिठितले
गोड गुलाबी
स्पर्श स्वप्नातले
फुल गुलाबाचे
प्रेमवेलीवर फुललेले
विरहात काळजाला
काटे कायमचे टोचलेले
-
कधी येशील सांग ना ?
तू मला भेटायला
किती दिवस लोटले
तुला पाहूनी निदान
स्वप्नात तरी येना
डोळ्यात साठवलेल्या
तुझ्या आठवणींनी
रात्र सरता सरेना
रात्री चंद्र असा सजला होता
चिंब ताऱ्यांनी भिजला होता
वेड्या सारखी तुझी वाट पाहते
स्वप्नात तुझ्या मिठीत रडत असते
खूप miss करते तुला
तू जवळ नाही म्हणून
माझ्या मनातल्या भावना
कधी कथेतून तर कधी कवितेतून
नकळतच शब्दात व्यक्त होते-