तुझा होतो मी
मागच्या सर्व जन्मी माझी होत आलीस तू,
या जन्मी ठरवलंय की तुझा होतो मी.
जर चुकलो तर गौतम ऋषी सारखा श्राप दे,
आणि अहिल्यासारखं दगड बनून राहीन मी.
यावेळी लष्कर घेऊन तू ये लंका पर्यंत शोधत मला,
आणि तुझ्या प्रेमाच्या पवित्रता साठी अग्निपरीक्षा देईन मी.
वाटलंस तर विश्वसाठी कृष्णा सारखा गोकुळ सोडून जा,
राधा सारखा आयुष्यभर वियोगातही तुझा होऊन राहीन मी.
पाहिजे तर या जन्मी तू सत्यवान हो,
आणि सावित्री सारखा यम कडून तुला आणेन मी.
यावेळी महात्मा फुले सारखं लोक कल्याणचं स्वप्न पाह तू,
आणि त्या स्वप्नांसाठी सावित्रीबाई सारखं अत्याचार सहन करीन मी.
माझी इच्छा आहे की यावेळी महादेव हो तू,
आणि पार्वती सारखं तुझ्यासाठी शेकडो वर्ष तपश्चर्य करीन मी.
मागच्या सर्व जन्मी माझी होत आलीस तू,
या जन्मी ठरवलंय की तुझा होतो मी.-
Pi... read more
सोबत रहा
तुझ्यासाठी पूर्ण जग जिंकेल,
तू फक्त माझ्या सोबत रहा.
तुझ्या प्रत्येक स्वप्न पूर्ण करीन,
तू फक्त माझा साथ देत जा.
गालावरची खळी नेहमी कायम ठेवीन,
तू फक्त माझ्याकडे बघून हसत रहा.
तुझ्यासाठी रात्री जेवण तयार असेल,
तू फक्त सकाळी चहा करत जा.
तुझे कपडे इस्त्री आणि घडी करून कपाटात असतील,
तू फक्त माझ्यासाठी उष्ट भांड्यांचा बघत जा.
तुझ्यासाठी लॅक्मे, कलरबार, रेवलॉन, शुगर पॉप,
मेबीलिन, लॉरियल नी भरलेला ड्रॉवर असेल,
तू फक्त माझ्यासाठी माझ्यासमोर शृंगार करत जा.
आयुष्यभरासाठी तुला आणि तुझ्या
नखऱ्यांना पापड्यांवरती ठेवीन,
तू फक्त जमलं तेवढं मला माफ करून मला समजवत जा.
तुझ्यासाठी पूर्ण जग जिंकेल,
तू फक्त माझ्या सोबत रहा.-
कोंकणी तट २.०
समुद्र तट असूनही वेगळा वैशिष्ट्य ठेवतो मी,
साधासुधा तट नाही कोंकणी तट आहे मी.
बराच वेळा अति उत्साहित अरबी समुद्रला थांबवलं मी,
सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, मुरुड जंजिरा यांच्या बांधकाम पाहिला मी.
माझ्या लांब तटाचं तीन राज्यात वितरण पाहिलं मी,
एकमेकात मुलांनाच भांडण बघणार असहाय्य बाप मी.
तटावरून नाव घेऊन जाणारा प्रत्येक कोळी ची वाट पाहतो मी,
त्यांच्या सहकुशलताची समुद्र कडे नेहमी अर्ज करतो मी.
कोटी न कोटी वेळी सूर्याला इथे मावताना बघितले मी,
या क्षितीजा समोर लोकांना आपल्या दुःख विसरताना पाहिले मी.
माझ्या तटावर येऊन आनंदित झालेल्या मुलांसोबत हसतो मी,
त्यांच्या स्मितेसाठी बरेच जत्रांचा आयोजक झालोय मी.
सर्वात शेवटी बप्पा ज्याला भेटून निरोप घेतो तो सौभाग्यशाली मी,
पण लोकांच्या अकृतज्ञता मुळे माघार घ्यायचं विचार करतोय मी.
समुद्र तट असूनही वेगळा वैशिष्ट्य ठेवतो मी,
साधासुधा तट नाही कोंकणी तट आहे मी.-
कोंकणी तट
समुद्र तट असूनही वेगळा वैशिष्ट्य ठेवतो मी,
साधासुधा तट नाही कोंकणी तट आहे मी.
शेकडो दशलक्ष वर्षांपूर्वी गोंडवाना वरून माझा प्रवास सुरू केलं,
या आशिया खंडात टक्कर देऊन मी हिमालयचा निर्माण केलं.
इथे येऊन सर्वात आधी अरबी समुद्र सोबत संबंध स्थापित केलं,
त्याच्या येणाऱ्या लाट्यांचं मी नेहमी स्वागत केलं.
प्रत्येक परदेशी व्यापारी चां पायांचा ठसा ना माझा मुकुट केलं मी,
पण त्यात आपल्या आजादीच्या अपहरणकर्ता ना ओळखू शकलो नाही मी.
कदाचित येणारा भविष्य बद्दल महाराजांना माहीत होतं,
म्हणून नौसेना तयार करून मलाही त्यांच्या मावळा केलं.
माझ्या वाळू वरती पाऊल ठेवून महाराजांनी मला खूप वेळा धन्य केलं,
या सौभाग्याला अमरत्व नव्हता म्हणून मी त्यांच्या पाऊलखुणांना जपून ठेवलं.
माझ्या वाळूत पाण्यासोबत मावळ्यांचा रक्ताचा पाझरणे झालंय,
आणि त्या गौरवशाली तटाचा तुम्ही कचराकुंडी करून ठेवलंय.
समुद्र तट असूनही वेगळा वैशिष्ट्य ठेवतो मी,
साधासुधा तट नाही कोंकणी तट आहे मी.-
एक घर
आधी आई, बाबा, बहिणीनं सोबत माझं एक घर होतं,
आता फक्त चार भिंती आणि एक छप्पर चां मकान राहिलं आहे.
आधी स्वयंपाक घरात अन्नपूर्णाची चूल पेटायची,
आता ती फक्त एक उपेक्षित खोली बनून राहिली.
एक वेळ होता जेव्हा खिशात चावी नसायची,
आता चावी नसली की मकान ही आत यायला देत नाही.
तो काळ वेगळा होता जेव्हा घरात खटाटोप आणि धांदल असायची,
आता तर शांतता ही हाताची घडी आणि तोंडावरचा बोट सोडत नाही.
नेहमी घरात पाऊल ठेवलं की नवीन चेहऱ्याने भेट व्हायची,
आता तर आरसात ही मला तो मी दिसत नाही.
आधी झोपण्यासाठी जागा शोधावी लागायची,
आता हात पायांचा पसाराला कोणी आवरत नाही.
आधी घरात प्रत्येकाला पदार्थाने भरलेली ताट भेटायची,
आता या मकानात देवालाही नैवेद्याचा साखर भेटत नाही.
आधी आई, बाबा, बहिणीनं सोबत माझं एक घर होतं,
आता फक्त चार भिंती आणि एक छप्पर चां मकान राहिलं आहे.-
जवळ येशील का?
खूप लांब राहिलीस आता जवळ येशील का?,
हे भांडण संपून मला मिठीत घेशील का?.
तू रागात जे बोललीस त्याला मी माफ केलं,
मी जे मन दुखावलं त्यासाठी मला माफ करशील का?.
प्रत्येक नात्यात लोक प्रेमापेक्षा अहंकाराला महत्त्व देतात,
पण तू फक्त आपल्या प्रेमाला महत्त्व देशील का?.
लोक म्हणतात स्वाभिमाना साठी प्रेमही सोडावे,
मग या कृष्णाची राधा होऊन त्यांना चुकीचा ठरवशील का?.
तुझ्याविना सत्यनारायण पूजेचा शिरा पण कडू लागतो,
तुझ्या हाताने भरवून त्याच्यात गोडवा आणतेस का?.
तुझ्या अभावामुळे ओठांना सगळं जेवण बेचव लागतोय,
तुझ्या खारट ओठांनी चावून त्यांचं चव आणशील का?.
सगळ्या जगाला माहित आहे मला उशीवर झोप येत नाही,
बाळा सगळं राग विसरून मला तुझ्या कुशीत घेशील का?.
खूप लांब राहिलीस आता जवळ येशील का?,
हे भांडण संपून मला मिठीत घेशील का?.-
आजकल जाते हुए को रोकता नहीं मैं,
क्योंकि उब गया हूं उन रिश्तो को बचाते हुए
जिन्होंने जिल्लते तोहफे में दिए है।
अब हंस के हर इल्जाम कबूल कर लेता हूं मैं,
क्योंकि थक गया हूं उन गुनाहों के लिए दोषी
कहलाते हुए जो जमाने ने मेरे साथ किए है।-
मन उब गया है अपनी उदास जिंदगी से,
एक दिन इस उदासी को खत्म कर दूंगा।
लेकिन उससे पहले अपने पसंद का
खाना खाऊंगा, एक महफिल सजाऊंगा,
अपनों से बातें करूंगा, झूठे रिश्ते तोडूंगा,
और फिर चैन से बिस्तर पर लेट जाऊंगा,
मजे की बात बताऊं? आज मैंने यह सब कर लिया है।-
मेरी वजह से मुझसे जुड़े हर इंसान को दुख है,
और उन्हें लगता है कि इस बात में ही मेरा सुख है।
तो चलो अपने सुख के साथ इनका दुख भी मिटाते है,
अपनों के खातिर अपनों के ही आगे पार्थिव शरीर बन जाते है।-
मौत की ख़बरें पढ़ता हूं तो लगता है काश मैं वहां होता,
तो कम से कम एक घर तो आज खुश होता।
मैं एक अवांछित इंसान यमराज से भला थोड़े लड़ लेता,
मैं तो बस किसी और के बदले अपनी मौत का सौदा कर लेता।-