komal gangthade   (G. Komal)
205 Followers · 5 Following

read more
Joined 22 May 2019


read more
Joined 22 May 2019
19 FEB 2021 AT 12:55

माझ राजं म्हणजे दक्खन चा पोशिंदा हुतं
अवघ्या हिंदवी स्वराज्याचा ते खांदा हुतं,
मुघलाला बी न घाबरता भगवा मिरवणार
ते एक सळसळतं रगात हुतं,
जात पात न मानता परत्येक हिऱ्याची पारख
करणार ते एक मूर्ती मंत उदाहरणं हुतं,
कितीबी बिकट परसंग आला तरी न डगमगता
त्याला सामोर जाणार निधड्या छातीचा अंगार हुतं,
गनिमी कावा करून मोठ्या शत्रूला बी सळो कि पळो करून सोडणार ते खनकर हुतं,,
आग्र्याची सुटका असो नायतर अफजल्या चा वध
संयम दाखवणार माझं राजं लय महान हुतं,, लय महान हुतं,... 🚩🚩🚩

-


24 OCT 2019 AT 17:02

मनाला उसंत नाही,,,
कारण 🕵️‍♀️🕵️‍♀️🕵️‍♀️🕵️‍♀️
वेदनेला अंत नाही... !!!!

-


28 SEP 2019 AT 11:28

सत्यात उतरूदे त्याला,,
नजर न लागो कुणाची,,
तुझ्या माझ्या संसाराला.. !!

तुझ्या सोबतीत रंगवलेले,
फक्त ते स्वप्न नाही सख्या,,
भविष्य आहे ते हे उमगले,
आतुरता आयुष्याची नवख्या.. !!

-


27 SEP 2019 AT 21:12

तू न सांगताच समजून घ्यावा,,

गंध आपल्या प्रेमातला,
असचं दरवळत राहावा,,

बंध आपल्या नात्यातला
अजूनच घट्ट व्हावा,,

प्रत्येक क्षण दिवसातला,
तुझ्याच सहवासात जावा..!!

-


24 SEP 2019 AT 15:22

सगळे म्हणतात माणसं ओळखायला शिका,,
पण सुरवातीला सगळेच चांगले असतात,, माणसं वेळेनुसार बदलतात,, अन मग आपल्याला पण ओळखू येतात मात्र वेळ निघून गेल्यावर... 🕵️‍♀️🕵️‍♀️🤷

-


23 SEP 2019 AT 11:04

स्वप्न होईल पुरे आपले
होणार मी तुझी साजणी,,
नव्या जगाच्या शुभारंभी
अनामिक हुरहूर दाटे मनी..!!

-


22 SEP 2019 AT 18:08

लपविलेस जरी तू सख्या रे,
दुःख ते सारे अंतरीचे,,
नकळत सारं सांगुनी जाती,
असे बोलके डोळे तुझे... !!!

-


22 SEP 2019 AT 17:54

भाव तुझ्या मनातले ते
न सांगताच समजतात,,
बोलके डोळे तुझे ते
सारं काही सांगून जातात... !!

-


21 SEP 2019 AT 8:17

ज्यांची झुकली नाही कधीच मान,
ज्यांच्या नसानसात होता स्वाभिमान,,
ज्यांचा अवघ्या मराठी मुलखाला अभिमान,,
ज्यांनी घडवले स्वराज्य हे आलिशान,,
असे ते माझे राजे शिवराय आमची शान... !!!

-


19 SEP 2019 AT 18:53

पाहता तुला नजर झाली ती दंग,,
बरसल्या श्रावणाच्या सरी अन शहारले अंग,,
मन विहारू लागले आकाशी स्वछंद,,
तुझ्या येण्याने आयुष्यात चढला नवा रंग,,
स्वप्नांची झालर मखमली डोलली पाखरा संगं,,
संगीत जीवनी आले जसा वाजे सुरेल मृदूंग,,


झाल्या चुका अजाणतेपणी झाले वातावरणच तंग,,
अनपेक्षितपणे मग झाला पहिला प्रेमभंग...... !!!!!

-


Fetching komal gangthade Quotes