किशोर टपाल   (किशोर)
36 Followers · 6 Following

Poet, Writer ,Photography
Joined 18 May 2018


Poet, Writer ,Photography
Joined 18 May 2018
किशोर टपाल YESTERDAY AT 21:27

मी गोपिकात दंग
तु येऊन करतेस त्याचा भंग..

म्हणतेस कान्हा हा तुझा बाहाणा
मी म्हणतो नाही राधे मी तुझाच दिवाना...

तुझ्या डोळ्यात तरलतात आसु
मी गहिवरून करतो हासु....

तु बिलगतेस हळूवार मिठीत
अनं मी तुझ्या मिठीत.....

-


4 likes · 5 shares

बरसना-या पावसात तु
खूणावतेस मला म्हणतेस ,
चल मोकळ्या माळरानात
फिरून आणते मी तुला....

तुझा कोरारंग, नाविन्याचा स्वर
ऐकून मी होतो तुझ्यावर स्वार
देवून रेसचा स्टार्ट करतो मोकळे
तुझ्या गतीचे पाश...

तु ,मी पाहतो माळरानाकडे
वाट मोकळ्या गर्द झाडांकडे...
तुझ्या गतीच्या वेगासोबत
सुरू होतो आपला प्रवास...

गर्द हिरवा निसर्ग , बेभान वारा
पावसाच्या धारा, वेगवान शहारा..
तु म्हणतेस, जरा जपुन राज्या
घे ब्रेकचा सहारा...

घेऊन मोकळा श्वास
आठवून भेटीची आस..
तुझ्या वेगवान स्वारीने मी,
गाठतो क्षणार्धात माळरान...

फिरवून तुझ्यावर मायेचा हात
मी डोळे भरून पाहतो
माझ्या प्रेयसीची वाट...

-


5 likes · 3 shares

हिरवाशालु, निसर्ग हिरवा..
तोही आज रंगला तुझ्या प्रेमात...

-


3 likes · 4 shares

एक होता रेडा
तो मला म्हणाला
अज्ञानात सुख आहे
मला शिकवू नको शाला..
.
.
.
.
.
.
: ज्ञानाची त्सुनामी आदलेल
तेव्हा उडून जाशील साला..

-


4 likes · 3 shares

जगाच्या नजरेत
तू आणि मी दोस्त होतो..
पण मनातून आम्ही
एकमेकांच्या जवळ होतो..

प्रेमा सारखं नाजूक अस काही असेल
हे आम्हाला कळलच नव्हतं...
तस जाणून घेण्याच
आम्ही काही प्रयास करत नव्हतो..

जेव्हा दुरवलो आम्ही ,
तेव्हा ते उमजल..
पण करणार काय त्या आधी
आम्ही सारं काही गमावलं...

एकमेकांच्या भेठीसाठी
वाट आम्ही पाहत होतो...
स्वताच्या चुकांसाठी
नशिबाला कोसत होतो..

जगाच्या नजरेत
तू आणि मी दोस्त होतो..

-


4 likes · 3 shares

प्रेम म्हणजे काय असत
त्याने हसून एकदा तिला विचारल

प्रेमा मध्ये फुलतात रंगिन फुले
प्रयत्नांने होतात सारे मार्ग खुले

त्याला नि तिला हवा असतो सहवास
सुखाचा एकांत आणि प्रेमाचा सुहास

प्रेम म्हणजे जीवनभरची साथ
जणु निर्जन वाटेवर आधाराचा हात

त्याचा हात हातात घेत , तिने उत्तर दिलं

प्रेम करण सर्वांनाच जमत नाही
ज्याला ते जमल त्याला ते मिळत नाही

सगळेच करतात म्हणून आपण करायच नसत
आणि जर केलच तर पुर्णपणे निभवायच असत

प्रेमात हसण सगळ्यांना शक्य नसत
कारण प्रत्येकाला ते सुख मिळत नसत

सगळीच मन सगळ्यांना कळत नसतात
म्हणूनच तर काही तरतात , काही फसतात

तिला मिठीत घेत ,त्याने त्याच मत मांडलं

-


3 likes · 6 shares

शोधसी विठ्ठल दरो दरी |
म्हणती येशील कधी विठ्ठला आमच्या दरी |
म्हणे विठ्ठल नाहि मी दारो दरी |
शोधसी मला तुझ्याच अंतरी ||

-


2 likes · 5 shares

नाहि मन स्थिर |
वैकुंठाचा हरि म्हणे ||
काय करशील वैकुंठी |
सुखी नाहि मन भूमंडळी ||

-


1 likes · 3 shares

बरसणारे पावसाचे थेंब
तु ओंजळीत घेतले,
तुला पाहून ते हळूच म्हणाले:
उगाच आमचे मरण थांबवले...

-


2 likes · 3 shares

तुला पावसात भिजताना
पाहून त्याला ही,
गंमत वाटली म्हणूनच
त्याने तुला मिठी मारली...

-


3 likes · 5 shares

Fetching किशोर टपाल Quotes

YQ_Launcher Write your own quotes on YourQuote app
Open App