Kiran Hatwar  
3 Followers · 2 Following

Joined 22 August 2020


Joined 22 August 2020
14 OCT 2022 AT 17:24

कर्तव्याचे ओझे वाहताना
शरीर माझे थकले आहे
भोग होते नशिबाचे
ह्याच जन्मी भोगते आहे

खेळ दैवचे सारे
दैवाने खेळूनी घ्यावे
माझ्याविना वाचलेत काय
संसार कश्याला म्हणावे

आयुष्याच्या वळनांवर
कितीदा असे अडखळावे
कधी संपेल हा वनवास
वाटते देह सोडूनि दयावे

-


22 JUL 2022 AT 15:56

वयोगट ५ ते १२ या मुलांमध्ये येणाऱ्या बऱ्याच समस्या आहेत ज्यामुळे पालकांना parenting (पालकत्व ) करताना गोंधळून जायला होतं. मुलांचे
1- Behaviour,
2- Concentration problem,
3- Mobile addiction
4- Lack of confidence... इत्त्यादी..
तसेच १३ ते १९ या वयोगटातील मुलांमध्ये तर बऱ्याच समस्या आपल्याला दिसून येतात,
1 # Study related problems,
2 # Peer Pressure
3 # वाढत्या वयामुळे व शरीरात होणाऱ्या बदलामुळे चिडचिडपणा,
4 # ताणतनाव,
5 # पालकांबद्दल गैरसमज,
6 # उद्धटपणा,
7 # विषमलिंगी आकर्षण
इत्यादी समस्यांवर उपाय सुचविते एकमेव ठिकाण... अनुभवी व प्रशिक्षित समुपदेशक (counselor) जिथे आपल्या समस्यांचे योग्य निराकरण करतात BRAIN STREET Counseling Hub . इथे मिळते तुमच्या सर्व समस्यांचे निराकरण.
मुलांच्या career बद्दल अचूक मार्गदर्शन, DMIT(Dermatoglaphy multiple intelligence test) ही टेस्ट विज्ञानाला मिळालेलं वरदान. ज्यामुळे आपल्या मधील असलेल्या क्षमतांची ओळख होते व आपल्या career ला योग्य दिशा मिळते. तर आता वेळ न दावडता लगेच registration करा व आपल्या मुलाची DMIT test करवून घ्या. लगेच संपर्क साधा.. 9325280008

-


19 JUN 2022 AT 13:43

खूप मोठया संकटकाळी आठवतो तो बाप असतो,
चिंध्या झालेली बनियन घालून मुलांकरिता नवे कपडे आणतो तो बाप असतो, कितीही दुःख झालं तरी कुणाहीसमोर खचून न जाता, न डगमगता खंबासारखा आपल्या पाठीशी उभा राहणारा, आतले आवंढे आतच गिळून टाकणारा बाप असतो, पिलांना पोटभर दाणा मिळावा म्हणून उन्हातान्हात दिवसभर राबणारा बापच असतो अश्या माझ्या आभाळासारख्या बापाला कुठलाच दिवस खास नसतो, माझ्यासाठी रोजच माझा बाप माझा हिरो असतो, ज्याच्यामुळे इतकं सुंदर जग मला बघायला मिळालं अश्या माझ्या बापाला रोजच माझे वंदन 🙏🙏🙏🙏 अख्या जगातिल प्रत्येक बापाला माझा साष्टांग नमस्कार 🙏🙏

-


19 JUN 2022 AT 13:39

खूप मोठया संकटकाळी आठवतो तो बाप असतो,
चिंध्या झालेली बनियन घालून मुलांकरिता नवे कपडे आणतो तो बाप असतो, कितीही दुःख झालं तरी कुणाहीसमोर खचून न जाता, न डगमगता खंबासारखा आपल्या पाठीशी उभा राहणारा, आतले आवंढे आतच गिळून टाकणारा बाप असतो, पिलांना पोटभर दाणा मिळावा म्हणून उन्हातान्हात दिवसभर राबणारा बापच असतो अश्या माझ्या आभाळासारख्या बापाला कुठलाच दिवस खास नसतो, माझ्यासाठी रोजच माझा बाप माझा हिरो असतो, ज्याच्यामुळे इतकं सुंदर जग मला बघायला मिळालं अश्या माझ्या बापाला रोजच माझे वंदन 🙏🙏🙏🙏 अख्या जगातिल प्रत्येक बापाला माझा साष्टांग नमस्कार 🙏🙏

-


9 MAR 2022 AT 23:32

आपण खूप मेहनत घेत असतो, खूप जीवाचा त्रागा त्रागा करित असतो, त्यात आपला परिवारही आपली साथ देतो पण, काही काळानंतर आपल्या मेहनतीचे फळ काहीच दिसत नाही तेव्हा मात्र आपण पार खचून जात असतो, आपल्या पाठी उभी असलेली आपली मनसेही थकून जातात, कधी कष्टाची चीज होईल, कधी हिला / ह्याला मेहनतीचे फळ मिळेल. मग काही दिवसांनतर आपल्या नशिबाला आपण दोष देत सुटतो. माझ्या नशिबातच नाहीये. मग आपली लोकही आपल्याला समजवायला लागतात की, त्या गोष्टीचा नाद सोडून दे, ते तुझ्या नशिबातच नाहीये. कधी कधी तर गोष्ट आपल्या कुवतीवर येऊन पडते आणि आपली लायकीच नाही असे आपल्याला वाटायला लागते. सगळं संपल्यागत होऊन जातं आणि त्यातच कुठूनतरी पुन्हा आशेचा किरण दिसायला लागतो. सगळे फळाची वाट बघून थकून जातात पण आपल्याला पुन्हा नवी उमेद मिळते आणि नव्या जोमाने आपण पुन्हा मेहनतीला लागतो. आणि मेहनतीचे फळ नक्कीच मिळते. मेहनत करत रहा त्याचे फळ नक्कीच मिळेल 🙏

-


9 MAR 2022 AT 23:30

आपण खूप मेहनत घेत असतो, खूप जीवाचा त्रागा त्रागा करित असतो, त्यात आपला परिवारही आपली साथ देतो पण, काही काळानंतर आपल्या मेहनतीचे फळ काहीच दिसत नाही तेव्हा मात्र आपण पार खचून जात असतो, आपल्या पाठी उभी असलेली आपली मनसेही थकून जातात, कधी कष्टाची चीज होईल, कधी हिला / ह्याला मेहनतीचे फळ मिळेल. मग काही दिवसांनतर आपल्या नशिबाला आपण दोष देत सुटतो. माझ्या नशिबातच नाहीये. मग आपली लोकही आपल्याला समजवायला लागतात की, त्या गोष्टीचा नाद सोडून दे, ते तुझ्या नशिबातच नाहीये. कधी कधी तर गोष्ट आपल्या कुवतीवर येऊन पडते आणि आपली लायकीच नाही असे आपल्याला वाटायला लागते......... सगळं संपल्यागत होऊन जातं आणि त्यातच कुठूनतरी पुन्हा आशेचा किरण दिसायला लागतो. सगळे फळाची वाट बघून थकून जातात पण आपल्याला पुन्हा नवी उमेद मिळते आणि नव्या जोमाने आपण पुन्हा मेहनतीला लागतो. आणि मेहनतीचे फळ नक्कीच मिळते. मेहनत करत रहा त्याचे फळ नक्कीच मिळेल... 🙏

-


26 MAY 2021 AT 13:03

विषय - शिकवण

बुद्ध बुद्ध म्हणूनि
मिरविती सारे सारे,
दिली त्याणे शिकवण
माणवा विसरलास तू रे |

प्रज्ञा, शील, करुणा
आता तू आठव
घे उचल लेखणी
आता तू चालव |

दिले बुध्दान्नी ज्ञान
शांतीचे आणि शीलतेचे,
किती गिरविलेस मानवा
धडे तू मानवतेचे

वेळ आहे तुजजवळ
आतातरी सावर स्वतःला,
दिला उपदेश गौतमाने
प्राशण कर रे त्याला |

सार्थ होईल त्यांची शिकवण
तू होशील सज्ञाणि,
म्हण आता बुद्ध बुद्ध
घेऊनि हाती लेखणी |

कवियत्री - सौं किरण रवी हटवार

-


16 MAY 2021 AT 11:46

उंबरठ्या आतली ती

स्त्रीला स्वतःच असं घर मुळात नसतंच,
उगाच ती स्वतःच्या मनाला सांत्वना देत असते, मी ज्या घरात माप ओलांडून आली तेच माझं हक्काच घर.😊
सत्य पाहता गेले तर ती फक्त त्या घरात आणलेली एक बायको आणि सून असते.. ती जोपर्यंत राबते, इतरांची काळजी घेते, इतरांच्या फार्महीशी पूर्ण करते तोपर्यंतच तिचं अस्तित्व त्या घरात असते, एकदा का ती जागेवरची झाली की ती घरातील लोकांची अडगळ बनते, तिला जागेवर खायला, प्यायला देणे, तिच्यावर औषधोपचार करणे म्हणजे वायफळ खर्च वाटायला लागतो.. आणि मग तिला टोमण्यांचे औषध देणे सुरु होत असते 😊😊 ज्यामुळे ती स्त्री विचार करून करून लवकरच बरी होत असते 😊.. (अर्थातच आतून पूर्णपणे तुटलेली असते तोंडावर हसू आणि मनात खूप साऱ्या वेदना घेऊन जीवन जगत असते) आणि पुन्हा मिरवायला लागते माझं घर माझं घर....

सौ किरण रवी हटवार
नागपूर

-


15 MAY 2021 AT 23:43

करोनायोद्धे
करोनामुळे शाळा माझी सुटली
सुरुवातीला जरा गंमतच वाटली

घरी राहून राहून कंटाळा आला
शाळेला जाण्यासाठी जीव कासावीस झाला

जेव्हा ह्या करोनाचे गुपित मला कळले
थरारक दृश्य समाजातील माझ्या डोळ्यांनी पहिले

माणसाला वाटे माणसाचीच भिती
कोण जाणे कुठून आली महामारी अशी

जावे अत्यावश्यक कामालाच लोकांनी
बाहेर अनर्थ फिरणे टाळावे सर्वांनी

मास्क लावणे, वारंवार हात धुणे
नियमांचे सर्वांनी काटेकोर पालन करणे

नियमित व्यायाम सकारात्मक विचार
हाच आहे महामारीवरती खास उपचार

आपण सर्व घरातच असतो सुरक्षित
मात्र करोनायोद्धे लढतात करोनाशी नियमित

घरच्यांपासून लांब राहून देतात वेळ कार्याला
ह्यांच्यातच बघितले हो मी माझ्या देवाला

देव आमचे डॉक्टर, पुलिस, सफाईकामगार
हृदयातून मागतो आम्ही तुम्हा सर्वांचे आभार
सौ किरण हटवार
नागपूर

-


21 APR 2021 AT 15:56

वासराला इकडे तिकडे हुंदडताना बघून गाय जशी खुंट्यावर हंबरते... अगदी तशीच अवस्था एका आईची झालीय.... डोळ्याने दिसून त्या वासराला गोंजारू शकत नाहीये ह्यापेक्षा वाईट दुर्भाग्य एका आईसाठी दुसरं कोणतं असणार आहे....

-


Fetching Kiran Hatwar Quotes