आजकल़ तुम्हारी शायरी में एक उदासी झलक आती है..!
-
#Poeticmulgi
#Writer
U can check my blogs also..
Link i... read more
लेखणीमधून शब्दं कागदावर उतरवण्याआधी
कितीतरी भावनांना उसवित बसतो कवी एकांतात
तर कधी गुंतून बसतो उगाचचं एखाद्या कवितेच्या पायाशी.
आर्त मनांत विचारांचा कल्लोळ माजतो एकीकडे
आणि दुसरीकडे कवीचे एक वेगळेच द्वंद्व चालू असते शब्दांशी
लिहिताना कधी एखाद्या शब्दाची आर्जव करतो कवी
तर कधी एखाद्या शब्दांवर कवी भाळतो..
दरवेळी लिहिण्याआधी शब्दांच्या असंख्य कळा सोसतो कवी
तेव्हा कुठे एक नवी कविता जन्म घेते
आणि त्याचवेळी कवीचा पुनर्जन्म होतो...-
आपण स्वतः मधल्या चांगल्या गुणांबद्दल नेहमीच भरभरून बोलत असतो
आणि सतत समोरच्या व्यक्तींना दोष देत राहतो
चला आज या होळी च्या दिवशी
स्वतःमध्ये असलेल्या दोषांचा ही हसतमुखाने स्वीकार करूया
होळी च्या या पवित्र अग्नीत या दोषांचे दहन करून
जुने सारे मागे सोडूया
आयुष्याच्या कोर्या कॅनव्हासवर नवनव्या रंगांचा कुंचला फिरवूया...-
एखादा समुद्रकिनारा आणि
चंद्र भाळी लावून मिरवणारी एखादी अशी रात्र ही पुरेशी असते लिहिण्यासाठी...-
तसा सावळा चं रंग आहे माझा
ही लोचणे आहेत बोलकी जराशी
ओठांवर असलेल्या त्या तिळामध्ये
तुला ओढं आहे जराशी
मी नव्हते तशी कृष्णवेडी
तु माझा कृष्ण झाल्यापासून
वेडी झाली आहे जराशी
तुझ्यावरची प्रीत माझी अल्लड
बघं तुला समजते का
ही सावळबाधा माझी जराशी..-
कसं सांगायचं तुला
की माझं किती प्रेम आहे तुझ्यावर
फक्त मला तुझ्यासारख व्यक्त होता नाही येत इतकचं
तु मात्र माझ्या अव्यक्त राहण्याला
माझं प्रेम नसणे समजतोस दरवेळी
कसं सांगायचं.. कसं बोलायचं
कितीतरी वेळ याच संभ्रमात आरश्यासमोर उभी राहते
तु समोर आल्यावर मात्र हे सगळे काही
मी क्षणांत विसरून जाते..-
आयुष्यात कितीतरी गोष्टी अगदी सहज सोप्या वाटू लागतातं
आपल्याला पडलेल्या आणि आपण शोधत असलेल्या कितीतरी प्रश्नांची उत्तरे आपल्याला मिळू लागतातं अगदी सहजपणे
फक्त आपल्याला आयुष्यात असलेल्या गोष्टींचा
स्विकार करायला शिकायला हवे..-
आयुष्यातील अजून एक रोजसारखी रात्र
घड्याळाच्या काट्याबरोबर दिवसभरातील मागे गळून पडणारे विचार
आणि पुन्हा एकदा उद्यासाठी मनांत असंख्य
विचारांचे आराखडे तयार करणारे आपले मन
हा रोजचा प्रवास किती कमालीचा असतो नाही का..??
म्हणजे एकीकडे रोजच्या दिवसभरातील विचारांच्या
जाळ्यातून स्वतःला सोडवताना
दुसरीकडे आपण चं उद्याचे विचारांचे जाळे विणतं जातो स्वतःसाठी
हा रोजचा रात्री ते पहाटेचा वेळ कितीतरी स्वप्नांनी भरलेला
आणि रोज तो चंद्र प्रत्येक क्षणी आपल्या बरोबर असतो
या रात्रीच्या प्रवासात आपण एकटे नाही,
तर तो ही आपल्या सोबत आहे हेच सांगायचे असेल कदाचित त्याला रोज..-