Kavita Dhobale   (सौ. कविता ढोबळे.)
92 Followers · 66 Following

: गुरू माऊली हीच माझी माय
नामात झाले माझे जिवन स्वामीमय!!
Joined 7 January 2023


: गुरू माऊली हीच माझी माय
नामात झाले माझे जिवन स्वामीमय!!
Joined 7 January 2023
5 HOURS AGO

मी भाग्यवान लाभला
संग मज पुस्तकांचा ....
बेरंग आयुष्याच्या पानी उमटे
अनुभवसंपन्न इंद्रधनू सप्तरंगांचा.....

निळ्या काळ्या शाईत
दिसे साक्षात देवी सरस्वती....
प्रतिबिंबित ज्ञानात
शाबुत राही निती... मती....

वाहणाऱ्या ज्ञानगंगेत होई
बुद्धी ...मन...पवित्र
मी भाग्यवान पुस्तकांच्या दुनियेत
आकारास येई बुद्धिसंपन्न चारित्र्य....

-


YESTERDAY AT 11:16

निंदकाचा शेजार असावा
अगदीच लागून खेटून....
प्रगतीचं बक्षीस द्यावं
निश्चिंतपणे त्यास विभागून....

सतत किरकिर ,सतत पिरपिर
तक्रारीचा पाढा वाचून वाचून ....
शिस्तीचे गणित आपलेच
जाते कायमचे पक्के होऊन....

सलते डोळ्यात कुसळ
नेहमीचीच चरफड ,तडफड....
मौनाची सवयच लागते मग
दुर्लक्षित करित वायफळ बडबड ....

जळफळाट, विघ्नसंतूष्टी स्वभाव
कोत्या मनाचा विकार ....
शेजारधर्म पाळत ...जपत
स्वीकारावा निंदकाचा शेजार....

-


27 APR AT 16:33

विचारांच्या अथांग सागरात
घे खोल उडी पामरा....
सुविचारांच्या लाटांसवे गाठ
शांत विवेकी किनारा ....

भरती ओहोटी कुविचारांची
येईल जाईल उधाणलेल्या दर्यात ...
कधी मोती कधी शिंपले वेचित रहा
नवरत्न याच खाऱ्या पाण्यात...

विचारांच्या अथांग सागरात
साठव नेत्री विवेकशिलतेची नितळता...
शोधीत जा मनन चिंतनात
विचारांची अथांग तेजसता....

-


25 APR AT 9:43

बेगडी दुनिया... रंग बेगडी
सरडाच तो बदले घडोघडी....

वरवरची वरकरणी ...वरवरची मनधरणी
खोटेनाटे नाटकी नाटके ती क्षणोक्षणी....

प्रेम बदलते.... वचने बदलती
बेगड्यात बदलेली फसवी ती नाती....

बेगडी दुनिया ... बेगडी माया
आतली बाहेरची बेगडी ती काया....

-


23 APR AT 14:03

वसुंधरा ही रुसली आज
सांगे तिची कहाणी....
हिरवा शेला ओरबाडला
सांगा सांगा हो कोणी??....

उरले न पान आता
हिरवी झाडे लता वेली....
गगनचुंबी इमारतींची
चढाओढ गगनाशी लागली....

मंजूळ, मधुर गाणे आज
बेसूर भकास झाले...
चिवचिव , कावकाव, कुहूकुहू
केविलवाणे वृक्षतोडीत छाटले....

सारे घेतले पोटात अत्याचार
मी साऱ्याची' जननी' म्हणूनी...
अति हव्यास तुझा मानवा
वाटे मीच घ्यावे मजला दुभंगुनी...

-


22 APR AT 16:52

नको नको बोलू अद्वातद्वा
जरा घाल लगाम जिभेला...
हाड नाही त्यासी म्हणून
जप शब्दाने तिच्या लवचिकतेला...

नको नको दवडू वेळ
निरर्थक करीत बडबड...
शब्द मोजके ,शब्द थोडके
जिंकत रहा वाणीचा रे गड.....

झरझर झरू दे वाणीत
संवाद प्रसन्न ,मर्मयुक्त...
प्रिय, मधुर , रसाळ बोल
घडो मधाळ व्यक्तिमत्व...

मत थोडक्यात मांडत
ताबा वाणीवर असू द्यावा...
उत्तम ,निपुण बोल
आत्मगुणांचा विकास करावा...

-


18 APR AT 8:16

विसरणे तुला कधीच शक्य नाही
गिरवणे कल्पनेत तुला अशक्यही नाही...

चालणे बोलणे उगवता मावळता
जगणे तुझ्याशिवाय श्वासांना मान्य नाही ....

बहरणे शब्दसुमनात गंधाळणे आजकाल
हे प्रतिभे!
श्वास तुझेच व्हावेत मागणे काही अन्य नाही....

-


17 APR AT 12:11

नयनरम्य जगात या
लदबदू दे घोस सर्वधर्मसमभावाचे....
वाहू दे डोंगरदऱ्यातून झरा
गात गाणे एकात्मतेचे....

स्पृश्य- अस्पृश्यांच्या दरीत
उमलू दे बाग लाल फूलांची...
वाढू दे विश्वाच्या अंगाखांद्यावर
वेल माणुसकीच्या सुमनांची....

नयनरम्य जगात या
बहरू दे प्रतिभेचा वसंत....
समृद्ध विचारांचा परिमळ
भरू दे विश्वअंगणी होऊन गंधित....

-


16 APR AT 14:15

उद्विग्न या मनाला
आशेचा बांध घालते
अशांत वादळाला
शांततेची सांध लावते....

कळते काळजीतल्या मनाची...
घूसमट... घालमेल....
हळव्या धुक्यांचे
धूसर मनःचक्षू पटल...

सरावलेत सारे खेळ
मनाचे अंतर्मनाला ...
नैराश्याला करित चितपट,
जिंकते उद्विग्न मनाला....

-


13 APR AT 16:54

सुर तुझे शब्द माझे
सुरेल गाणे व्हावे...
मधूर प्रितगीतात
तू अन् मी रमावे...

-


Fetching Kavita Dhobale Quotes