आयुष्य
हसन कधी मागावं लागतं
हसन कधी चोराव लागतं
ओठावरच्या दवबिंदूला कधी
ओठानेच टिपाव लागत....
आयुष्याचा काय भरवसा
नित क्षणाची वाट आहे
इथे उजेडात रात्र अन
अंधारात पहाट आहे....
_KalyaniTushar-
मनातील अहंकार , क्रोध
या विचारांना धुवून काढतो
जीवन जगत असताना
करुणेचा, प्रेमाचा संदेश देतो
आयुष्याच्या वळणावर
कर्तुत्वाची जाणीव करून देतो
निराश झालेल्या जीवनाला
आत्मविश्वास मिळवून देतो
अंधारात भटकले जे त्यांना
प्रकाश मिळवून देतो
मोडून पडलेल्या संसारातही
नव निर्मानाची जिद्द देतो
माणसाने कसे वागायचे
हे नेहमी तो शिकवतो
अहिंसा करुणा प्रेमचा तो
नेहमी संदेश देतो
#नमन अश्या गुरूंना-
क्या ये सच है???
एक चीज़ के लिए सौ बार कहती हु,,
बस मेरी ही बात तुम्हे सुनाई नही देती
या सुनकर अनसुना कर देते हो।।
बस मेरी ही आंखे पढ़ नहीं पाते
या पढ़कर अनदेखा कर जाते हो।।
यूं तो सब कुछ याद रेहेता है तुम्हे
बस बात मेरे बारे हो तो भूल जाते हो।।
कुछ कमी सी महसूस होती है मुझे मुझमे।।
क्या करू जो मेरे होने का एहसास जगे तुझमें।।
-
काय बोलू सांग ना
बोलून तुला कळतं नाही
तरीही बोलते रे मीचं नेहमी
अपेक्षा तुझ्या सांग अजून काही..-
वादळ ...
माझ्या मनातलं....
का...कुणास ठाऊक...
काहीसा हरवत चाललाय तुझ्या माझ्यातला संवाद
अस्वथ करतोय..मूकपणे मनाशी मनाचा चाललेला वाद..
वाटतं कधीतरी स्वतःहून बोलावं तुम्ही
का मीच द्यावी पुन्हा पुन्हा साद
खूप काही ऐकायचं असतं..बोलायला ही शब्द आतुर..
प्रयत्न ही करते खूप
पण ओठावर यायला मात्र शब्दच झाले आहेत निष्टुर....
-
**मनाला समझवायला हवं**
नको उगाच रुसवा
ना नाराजगी कशाची
समझावं मनाला तुझ्या
आता निभावून न्यायला हवं
मनाला समझवायला हवं....
नको प्रतिऊत्तर कुणाला
ना द्वेष इथे कुणाचा
विसरून आवडी तुझ्या
आत्ता बदलायला हवं
मनाला समझवायला हवं....-
जी तो रहे है सब
पर जीने में अब वो बात नही रही....
हंस तो रहे है सब
पर खुशियों की वो सौगात नही रही...
कोई मर मर के जिंदा है
कोई मर कर भी जिंदा है
जिंदा तो है सब
पर जीने की वो चाहत नहीं रही....
-
साई(सासू+आई)
सासू तुम्ही आहात पण आई माझी झालात
नवीन नात्यांच्या उंबरठयावर माई झालात...
प्रत्येक पाऊल टाकताना आधार दिला
कुणी थोड जरी मला बोलले पटकन त्याला प्रतिउत्तर तुम्ही केला..
तुम्ही असताना कशाची भीती वाटत नाही...
माहेरची सर तुम्ही पूर्ण भरून काढलात...
तू आधी खा... अस जेव्हा तुम्ही रागावून सांगता...
त्या वेळेस तुम्ही खरचं माझी आई असता..
माझ्या प्रत्येक केलेला कामाची जेव्हा तुम्ही प्रसंशा करता
तेव्हा तुम्ही खरचं माझी आई असता...
हे नात असच राहो निरंतर आणि
पुढच्या जन्मी मी तुमच्या कुशीत लहानपण
अनुभवावं.. एवढंच मागणं आज..
देव तुम्हाला उदंड आयुष्य देवो
-
प्रिय *साई*
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा...
आज खूप काही लिहायचं होत...खूप काही करायचं होत तुमच्या साठी....पण...असो..... हे ही दिवस निघून जातील...
प्रेम आणि आदर..आणि तुमची प्रतिमा शब्दात रेखाटन मुळात खूप कठीण आहे माझ्या साठी...
तुम्हाला साई नाव देन्या मागे उद्दिष्ट एवढच की...
-
कोण कुठे कसा जाईल
कुणाचाच भरोसा नाही...
वेळ निसटण्या आधी
जगून घ्या निवांतीचे चार क्षण....
विश्व आपलं एवढंच
चार भिंती चार जण..
हसत खेळत आनंदाने
जगून घ्या निवांतीचे चार क्षण...
रुसण नको फुगण नको
करत चला मोकळं मन..
सावरा ..सांभाळा आपल्यांना
जगून घ्या निवांतीचे चार क्षण....-