आजवरच्या प्रवासादरमान्य कित्येक #ति ची साथ लाभली त्यासर्वाबद्दल आभार मानून व्यक्त होणे कधीच शक्य होणार नाही.प्रत्येक #ती ही खूप खास होती आहे आणि राहणार हे नक्की.पण यापुढेही असंख्य #ती भेटील त्याच्या सहवास नवीन काही शिकता येईल मात्र जुन्या आठवणींचा साठा जपत नवीन प्रवासाला गती मिळेल हे नक्की.
आपण होतात आहात आणि कायम राहाल हिच आशा मनाशी बाळगत या #ती चा प्रवासाला सुरू ठेवतो..!-
श्रीसाईनाथा..
मी पुढे पुढे चालत राहावे
तू फक्त मागे माझ्या कायम उभे राहावे,
चुकलो कधी वाट तर ती वाट तूच सुधारावे,
साई नामाचा जप आणि ओम साईचा मार्ग माझा तुझ्या चरणाशी राहावे..!
●||ओम साई राम ||●-
महाराष्ट्राच्या मातीतली मराठमोळी
साडी अंगावर नेसुनी मायेची ती ऊब झाली,
स्वताचे ते आभाळागत दुःख बाजूला सारुनि
ती हजारो अनाथ लेकरांची माई झाली,
ना कोणता मोठेपणा ना कोणता गर्व होता
तिझ्या मुखातून निघणारा प्रत्येक शब्द जणू
अनुभवाचा खराखुरा बोध होता,
शिका शिकवा आणि मोठे व्हा यावर
तिचा विश्वास होता, अनाथाचा संसार थाटून
तिने कित्येक जणांचा प्रवास यावरच रचला होता,
आज या प्रवासाला विश्रांती मिळाली
अनाथाची माय आज सर्व लेकरांना
अनाथ करुनि देवा घरी गेली....!
सिंधुताई सपकाळ
यांना भावपूर्ण श्रद्धांजली..!-
मला तर आज ही तिचं Friend आवडते
जी भेटली कधी नकळत तरी तिझ्या मुलांना हे Uncle तुमच्या मम्मीचे Best-Friend होते आहे आणि राहणार म्हणून बजावुन सांगते...!😀-
आयुष्यात
जोवर तुझ्यासारखी नागीण होती
तोवर "नागपंचमीची" मज्जाच काही तरी अलग होती...!
असो
नागपंचमीच्या तुला ही शुभेच्छा..!-
कधी तरी विचारा त्या मित्राला ज्याला वडील नाहीत,
जगाच्या या दुनियेत तो कितीही श्रीमंत असला तरी त्यांच्या इतका वडील प्रेमासाठी भिकारी कोणीच नाही..!
कधी तरी विचारा त्या सोनपरीसारख्या मैत्रिणीला जिचे सर्व स्वप्नं-हट्ट-लाड न सांगता पूर्ण होता पण मायेने काळजी घेणारे वडिलांचे हात पाठिशी नाही..!
मग एकदा नक्की
कधी तरी विचारा आपल्याच मनाला आपल्या वडीलांनी
कधीच-कोणत्या गोष्टीसाठी आपल्या कमी पडू दिले नाही..!
म्हणजे आपण किती नशीबवान आहोत..-
सहज मनात विचार आले,
या जन्मीं न देता आलेल नात तुला
पुढल्या जन्मी तरी कोणत्या रुपात दयावे..??
लगेच एक चित्र डोळ्यासमोर माझ्या उभे राहावे
माय माझी होऊनि तू कायम काळजी माझी घ्यावे,
नकळत माझ्या मनातलं सारं काही समजून तू त्यात घ्यावे
नात तुझं माझं त्याजन्मीं सर्व जगाला कळावे
हेवा वाटावा इतकं सारं काही त्यात असावे..…
●|| #आई ||●
-
After long time
मी त्यांना पाहिलं,
त्यांच्या गोड स्माईलचे उत्तर मी देखील स्माईलने दिलं,
त्यांनी माझ्या हातातकडे पाहून देवाच्या भेटीला निघालास म्हणून विचारना केली...
मी ही त्यांना होकाराची मान हलवुन पुढच्या दिशेला प्रस्थान केले..
After long time मी त्यांना पाहिलं...-
आई
तिझी असो या माझी..
ती कायम जगात सर्वत्म श्रेष्ठ आहे,
माझ्या प्रेमासाठी माझ्या आईने तिझा स्वीकार केला,
तिझ्या आईने मात्र लेकरांच्या सांगण्यावर माझा धिक्कार केला,
वाईट नाही व्हो दोघीपण कष्टाच्या संसारावर त्यांनी आम्हांला जीवन दिले संस्काराचे आणि आदर्शाचे धडे गिरवले,
कधी चुकलो आम्ही तर आमचे कान धरले आणि कधी नकळत ठेच लागता आम्हाला तर जीवापाड प्रेम दिले,
काळाच्या या भोवळ्यात काय दिवस परतून येतील माहीत नाही पण आई मात्र आई आहे कायम आईच राहील...-
शिकवा नही हमे गुनाह करने का,
शिक..वा नही हे हमे गुनाह करने का,
पर भूल गये वह लोग जिने हमको
अपना कहना था..-