पहिला आंतरराष्ट्रीय ब्रेल दिवस 04 जानेवारी 2019 रोजी जगभरात साजरा करण्यात आला. 4 जानेवारी 1809 रोजी जन्मलेल्या लुई ब्रेल यांच्या जयंतीनिमित्त हा दिवस पाळला जातो. याविषयी संयुक्त राष्ट्र महासभेने 06 नोव्हेंबर 2018 रोजी जागतिक ब्रेल दिनानिमित्त एक ठराव मंजूर केला होता. युनायटेड नेशन्स जनरल असेंब्लीद्वारे 2019 मध्ये जागतिक ब्रेल दिवसाची स्थापना करण्यात आली. ब्रेल भाषा ही सहा ठिपके वापरून वर्णमाला आणि संख्यात्मक चिन्हे दर्शविण्याची एक रणनीतिक पद्धत आहे. ही पद्धत दृष्टिहीन लोकांना केवळ अक्षरे आणि संख्याच नव्हे तर संगीताच्या नोट्स, वैज्ञानिक आणि गणितीय चिन्हे देखील स्पर्शाच्या संवेदनेद्वारे ओळखण्यास मदत करते.
ब्रेल ही एक स्पर्शात्मक लेखन प्रणाली आहे. हे एका विशिष्ट प्रकारच्या उंचावलेल्या कागदावर लिहिलेले असते. त्याची रचना फ्रेंच अंध शिक्षक आणि शोधक लुई ब्रेल यांनी केली होती. त्यांच्या नावावरून या पद्धतीला ब्रेल लिपी असे नाव देण्यात आले आहे. ब्रेल मध्ये फुगलेले ठिपके असतात. ते 'सेल' म्हणून ओळखले जातात. काही ठिकाणी बिंदू किंवा ठिपके हे कमी फुगलेले असतात.
या दोघांची मांडणी आणि संख्येवरून पात्रांचे वेगळेपण ठरवले जाते. ब्रेलचे मॅपिंग प्रत्येक भाषेत वेगळे असू शकते. या लिपीत शाळकरी मुलांसाठी पाठ्यपुस्तकांशिवाय रामायण, महाभारत यांसारखे ग्रंथ छापले जातात. अनेक पुस्तके ब्रेल लिपीतही येतात.-
फ़िज़ा में ज़हर भरा है जरा संभल कर चलो,
मुखालिफ आज हवा है जरा संभल कर चलो,
कोई देखे न देखे बुराइयां अपनी,
खुदा तो देख रहा है जरा संभल कर चलो।-
दास गणू महाराज यांनी मोठ्या प्रमाणात केलेल्या संत चरित्रलेखनामुळे त्यांना 'आधुनिक महाराष्ट्राचे महीपती' म्हणून ओळखतात.
महाराज पोलीसखात्यात नोकरीला होते, तरी त्यांच्या ओढा मात्र परमार्थाकडेच होता. यादरम्यानच त्यांच्यावर त्या काळचा कुख्यात गुंड कान्हा भिल्ल याला पकडण्याची जबाबदारी सोपविण्यात आली. जेव्हा त्या गुंडाला ही बातमी कळाली, तेव्हा त्याने महाराजांना जीवे मारण्याचे ठरविले पण महाराज यातून सहीसलामत सुटले. तेव्हापासून त्यांची अशी धारणा झाली की देवानेच आपल्याला वाचविले. मग त्यांनी संपूर्ण जीवन देवाच्या चरणी अर्पण करण्याचे ठरविले.
दासगणू महाराज साईबाबा यांचे परमभक्त होते. साईबाबांच्या स्फूर्तीनेच त्यांनी ओवीबद्ध रचना करण्यास सुरुवात केली. त्यांच्या अभंगस्वरूप लेखनात साईबाबांचा उल्लेख सतत येतो. 'गणू म्हणे' ही त्यांची नाममुद्रा. ते साईबाबांनाचा ब्रह्मा-विष्णू-महेशांच्या रूपात पाहत. दासगणू महाराज हेच साईबाबा संस्थानचे पहिले अध्यक्ष होते.
श्री गजानन विजय : या ग्रंथामधे श्री.गजाननमहाराजांचे चरित्र दासगणू महाराज यांनी लिहून ठेवले आहे. हा ग्रंथही महाराष्ट्रात खूप लोकप्रिय आहे.
गोदामाहात्म्य : ब्रह्मपुराणातील गौतमीमाहात्म्यावर आधारलेला, गोदावरी नदीचे व तिच्या तीरावरील तीर्थक्षेत्रांचे माहात्म्य.
भक्तिसारामृत,
भाव दीपिका
शंकराचार्य चरित्र
शिर्डी माझे पंढरपुर (साईबाबांची आरती)
-
लोग नए साल मे बहुत कुछ नया मागेंगे
लेकींन मुझे वही पुराना तुम्हारा साथ चाहिए..!!-
येणारे प्रत्येक नवे वर्ष हे 'थर्टी फर्स्ट' नंतर येत असल्याचा अस्मादिकांचा दीर्घ अनुभव आहे. त्यामुळे नविन वर्षाची एक तारीख कधी येते असे कुणी विचारल्यास आम्हास आधी 'थर्टी फर्स्ट'ची आठवण होते. (कारण त्यापुढील दिवसाची आठवण आमच्या मेंदूत बहुतांश वेळा 'डोके जड झाल्याने' नसते.) त्यामुळे एक जानेवारी हा दिवस आमच्या आयुष्यात अनेकदा दुपारनंतरच उजाडलेला आम्ही पाहिला. यावरून आमचे असेही मत झाले, आहे की हा दिवस थेट दुपारीच उगवत असावा. या दिवशी सकाळ होतच नसावी, असा आमचा दाट संशय आहे. दुसरे म्हणजे या दिवशी दुपारनंतर डोके जड होत असल्याने पृथ्वीच्या वातावरणातच मूलतः काही बिघाड होत असावा, असा आमचा कयास आहे. याला थर्टी फर्स्ट साजरे करणारी तमाम मंडळी दुजोरा देतील याविषयी मला काहीही शंका वाटत नाहीये.
सबब, येथे विषय थर्टी फर्स्टचा नसून तारीख एक जानेवारीचा आहे. या दिवसापासून म्हणे वर्षाची सुरवात होते. आणि एक तारीख ही संकल्पाची असते, असे आम्ही ऐकले आहे.
तर येथे विषय संकल्पाचा आहे. संकल्प हे करायचे असतात. पाळायचे नसतात. असे वाक्यही आम्ही ऐकले आहे. (कारण ते आम्हीच तयार केले आहे.) वस्तुतः संकल्पाच्या राशी तयार होतील एवढे संकल्प अस्मादिकांच्या थोडक्या आयुष्यांत झाले आहेत. अखेरीस आम्ही संकल्प न करण्याचा संकल्प एके वर्षी केला. पण तोही संकल्प काही पाळला गेला नाही. आणि आम्ही संकल्प करण्याचे काही सोडले नाही.
-
"प्रत्येक पावलाला वेगळे रस्ते सापडत
जातात पण निवड आपल्यावरच
असते शेवटी.....-
भारत कृषीप्रधान देश असल्याने देशात शेतीशी संबंधीत अनके सण, उत्साव साजरे होतात. यातीलचं एक सण म्हणजे वेळ अमावस्या. मराठवाड्यात दरवर्षी या सणाचा एक मोठा उत्साह पाहायला मिळतोय. या सणानिमित्त दरवर्षी शेतातील काळ्या आईचे ऋण फेडण्यासाठी तिची पूजा केली जाते. मूळ कर्नाटकी असणारा हा सण महाराष्ट्रात उस्मानाबाद, लातूर, सोलापूर आणि परळीचा उर्वरित भागात साजरा होतो. मार्गशीर्ष अमावास्येला हा उत्सव साजरा केला जातो. पेरणीनंतर येणाऱ्या सातव्या अमावास्येला हा उत्सव होतो. (vel amvasya)
या दिवशी मातीची लक्ष्मीची मुर्ती तयार केली जाते. गावातील सर्व थोर, लहान शेतात गोळा होत या काळ्या आईची पूजा करतात. (people celebrate amvasya) तिला गोडाधोडाचा नैवद्य दाखवत आणि वनभोजनाचा आनंद लुटत असतात. वेळ अमावस्येला बोली भाषेत येळवस असेही म्हटले जाते. यावेळी शेतातील पांडवांना नवा रंग दिला जातो. तसेच रब्बी हंगामातील गहू, हरबरा, ज्वारी, करडई, सुर्यफुल आदी पिकात चर शिंपून रब्बीचा हंगाम चांगला होऊ दे, अशी देवीकडे प्रार्थना केली जाते.
उत्साह आणि नवचैतन्य निर्माण करणारा ऋतू म्हणून हिवाळा मानला जातो. आयुर्वेदानुसार, हिवाळा ऋतूनुसार घेतला जाणारा आहार शरीरास पोषक असतो. त्यामुळे तब्येतही तंदुरुस्त राहते. या दिवसांत फळ आणि पालेभाज्या खाण्याचा सल्ला दिला जातो. या ऋतूत प्रचंड भूक लागते तसेच पचनसंस्था चांगली राहते.
Kailash
-
पेरणीचा कालावधी : उन्हाळी हंगामातील ज्वारीची काढणी पावसाच्या पूर्वी म्हणजेच मे महिन्यापर्यंत झाली पाहिजे. त्यासाठी पेरणी डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात ते जानेवारीच्या पहिल्या पंधरवाड्यापर्यंत करावी. पेरणी करताना रात्रीचे तापमान १० ते १२ अंश से. पेक्षा जास्त असावे. यापेक्षा उशिरा पेरणी केल्यास फुलोरा एप्रिल ते मे महिन्याच्या जास्त तापमानात सापडून बीजधारणा होत नाही. पर्यायाने उत्पादनात घट येते.
ताटांची योग्य संख्या : उन्हाळी ज्वारीची पेरणी दोन ओळींतील अंतर ४५ सें.मी. (१८ इंच) ठेवून करावी. उगवणीनंतर तीन आठवड्यांनी दोन रोपांतील अंतर १५ सें.मी. ठेवून विरळणी करावी आणि हेक्टरी ताटांची संख्या १,३५,००० ठेवावी.
रासायनिक खताचा वापर : उन्हाळी ज्वारीचे पीक ओलिताखाली घेतले जाते. हेक्टरी ८० किलो नत्र, ४० किलो स्फुरद व ४० पालाश द्यावे. त्यातील अर्धे नत्र व पूर्ण स्फुरद आणि पालाश पेरणी वेळेस व अर्धे नत्र ३५ ते ४० दिवसांने पाण्याच्या पाळीसोबत द्यावे.
आंतर मशागत : १५ दिवसांच्या अंतराने २ ते ३ कोळपण्या आणि एखादी निंदणी आवश्यक करावी.
पाण्याचे व्यवस्थापन : पेरणीनंतर १५ मी. रुंदीचे व २५ ते ३० मी. लांबीचे सारे पाडून त्याद्वारे पाणी द्यावे. पिकाच्या संवेदनशील अवस्थाप्रमाणे पाण्याच्या ४ ते ५ पाळ्या द्याव्यात.
Shri sairaj agro ageancies maratala
-
तार्किकांचा टाका संग । पांडुरंग स्मरा हो ।
तर्काने चालणाऱ्या लोकांत म्हणजे त्यांच्या तर्कात शक्ति नसते.तर्कामुळे निव्वळ एखाद्या चांगल्या विषयालाही फाटे फुटतात.फक्त तर्काने दृढनिश्चय होत नाही.हे पण चांगले ते पण चांगले असच वाटत राहत.डोळ्यांसमोर अनेक वाटा दिसतात.कोणत्या वाटेने वाटचाल केल्यावर इच्छित स्थळी पोहचू ते ठरत नाही.त्यामुळे लिहणे वाचणे शिकणे जरी कमी झाले तरी हरकत नाही.पण हृदयात प्रेम आणि भक्ति मात्र असलीच पाहिजे.आळसाला आणि अहंकाराला तिथे आळस नको.तुकोबाराय कलियुगातील लोकांना सांगून गेलेत.
कलिमध्ये दास तुका।जातो लोका सांगत.
-
३. भांडणात दुसऱ्यांवर मात मिळवण्याऐवजी स्वतःच्या मनावर विजय प्राप्त करा. त्यामुळे मन दुसऱ्यांशी चढाओढ करण्यासाठी धडपडणार नाही. आणि इतरांशी झालेल्या वादात तुम्हाला हार पत्करावी लागली, तरी तुमची मनःशांती कोणीच हिरावून घेऊ शकणार नाही.
४. जिथे अहिंसा असते, तिथेच मन:शांती लाभते.
५. आपला जीव जितका महत्त्वाचा आहे, तितकाच दुसऱ्याचा जीवही महत्त्वाचा आहे. त्याला मारण्याचे पातक करू नका. जगा आणि जगू द्या.
६. आपले ध्येय गाठण्यासाठी दुसऱ्यांच्या हक्कांची पायमल्ली करू नका. तुमच्या यशाचा मार्ग नैतिक असेल, तरच ध्येयाच्या शिखरावर पोहोचल्याचा तुम्हाला निर्भेळ आनंद प्राप्त होईल.
७. वाईटाला वाईटाने संपवू पहाल, तर वाईट वृत्ती अधिकच उफाळून येईल. रागाला रागाने नाही, तर प्रेमाने जिंकता येते, हेच वैश्विक सत्य आहे.
८. एकवेळ कोणाशी मैत्री झाली नाही तरी चालेल, पण कोणाशी शत्रुत्त्व अजिबात पत्करू नका. जमलेच तर जगन्मित्र होण्याचा प्रयत्न करा.
९. इच्छा, भूक आणि वृद्धत्त्व या तीन गोष्टींची पूर्तता करण्यासाठी मनुष्य आयुष्य खर्च करतो. कष्टाने या गोष्टी मिळाल्या नाहीत, तर वाम मार्ग पत्करण्याची मनुष्याची तयारी असते. त्यावेळेस आपली विवेकबुद्धी जागृत ठेवा.
१०. मनुष्याने केवळ मनुष्याचा नाही, तर संपूर्ण जीव सृष्टीचा आदर केला पाहिजे. त्यांची काळजी घेतली पाहिजे. आपण निसर्ग सांभाळला, तरच निसर्ग आपल्याला सांभाळेल.
-