कैलास सलादे-पाटील  
16 Followers · 28 Following

Joined 27 June 2019


Joined 27 June 2019

तुझ्या आठवणींच्या
पाऊलखुणांवर मनाचे अल्लड
वासरू हंबरू लागते...
माझ्या पापण्यांची व्याकूळ
गाय सैरभैर होते...

-






डॉ.कैलास सलादे

-



कोरडे आभाळ कोरडेच दिस
आवळिला फास गळ्यामाजि||

पाण्या पावसाचे उडाले दिवस
जगण्याची आस मालावली||

वाऱ्यावर सारे येणारे आधार
आपलेच मेर शेतखाती||

डॉ. कैलास सलादे

-



मातीत
हिरव्या
सावल्या
पेरताना....

माती होते
लेकुरुवाळी
ब्रह्मानंदी
लागते टाळी...

मातीचा
मळवट
आमच्या
भाळी
मातीनेच
भरते
आमची
झोळी..

डॉ। कैलास सलादे

-



ज्यांनी मला अज्ञानाच्या अंधकारातून ज्ञानाच्या प्रकाशाकडे नेले त्या गुरूंपैकी आपण एक आहात.

गुरु पौर्णिमेच्या आपणास हार्दिक शुभेच्छा

-



दुसरो का घर तोडकर
खुदका मकान बनाया नही करते...😢😢

-



वास्तू निर्माण करताना सिमेंट मध्ये जान नाही तर रक्तात इमान असावे लागते...
खडकवासला धरण, पुणे
कॉन्ट्रॅक्टर-महात्मा जोतिबा गोविंदराव फुले

-



तू विसरलीस मला, मात्र मी विसरणार नाही तुला
कारण तुझ्या आठवांचा काळजात रुतलेला भाला

-



तू दिल्या शपथांचे मी कुठवर वाहू ओझे..
हे जखमांचे पंख आता गळून आले माझे ....

-



आताशा भीती वाटते-
माणसाच्या काळजात डोकवताना...
कोरड्याठाक नाडग्यासारखा
माणसातला माणूस आटत चाललेला...
संवेदनांच्या पाख्या केव्हाच मुक्या झाल्या
आता तर थारुळं ढासाळावं
तसा माणूसच ढासाळू आलेला...

-


Fetching कैलास सलादे-पाटील Quotes