वचन साथीचे तुझ्याबरोबर
सप्तपदी चालताना मी दिले तुला...
पण तू ते निभावताना सख्या
न विचारात घेतले कधी मला...

तुक्सयासोबतच घालवायची
होती मला ही संसाराची वाट...
आणि वाहायचे होते तुझ्या
प्रेमाचा बनून गं पाट...

वचन साथीचे तुझ्याबरोबर
घेऊन सांगायचे आहे तूच माझा श्वास...
तुझ्याचसाठी जगण्याचा
प्रत्येक श्वासात भरलाय मी विश्वास...

- सौ.आश्विनी श्रीहरी मेंगाणे.