चुकीचा निर्णय घेऊन बरोबर
करण्यात आयुष्य घालवू नका,
चार लोकांच्या भिती मुळे
कोणाचं तुम्ही खेळणं होऊ नका..-
एक विद्रोही बंडखोर,
समाजसेवा, कवी,विद्रोही जलसा,वाचक,लेखक,
✒️... read more
माझ्या गैरहजेरीत सुखाचा
प्रवास तुझा कर प्रिये,
मागे वळून पाहू नको
जरी झाला माझा अंत प्रिये..-
लिहीता लिहीता मी फार सोडल्या कविता,
प्रेम कहानी सारखेच नशिब अधुऱ्या कविता..-
आभाळावर तुच अंधार पाडला
म्हणून तर शोध व्यर्थ गेला,
संपणार नव्हता जिव्हाळा कधी
तरी ही उजेडावर तू प्रहार केला-
तू केलेल्या बंडाचा सवाल
पचला कधी ही जाणार नाही,
आजही उद्या ही इथली व्यवस्था
तुला माणूस म्हणून पाहणार नाही..-
अंगणाने आपली सुंदरता
कायम टिकवावी
येवढीच इच्छा उंबऱ्याची
त्या पुर्ण व्हावी,
घराचा ओलावा कायम अबाधित
राहावा म्हणून
लग्न नंतर कोणतीच बहीन
परकी नसावी...-
धर्माच्या कोठडीतून विषमतेचा फसा टाकणारा
तुच अपराधी आहे समतेवर बलात्कार करणारा
हाडा मासाला देहात वाहणाऱ्या त्या रक्ताला ही
तुच मानवतेला हेपलत आलाय सत्तेसाठी सरकारा-
शब्दांचा पसारा आवरण आधाराचे घालतो
नको वाटणाऱ्या श्वासाचे आयुष्य वाढवतो..-
ओळखायला चुकलो होतो जरासा
मुखवट्याला फसलो होतो जरासा
केवढी रंगली मैफील सोबत माझ्या
मी माझा ही उरलो नव्हतो जरासा
काळीज खोलले आण चुक झाली
बाजारात मग फिरलो होतो जरासा
वाटले सारे ह्रदयाच्या पार माझ्या
नश्वरतेला मग विसरलो होतो जरासा
करतो तिच्यावर तितकेच प्रेम आजही
जरी काल मी तुटलो होतो जरासा
केलीच नाही तक्रार भान हरवल्याची
शुध्दीत जगाला दिसलो होतो जरासा-