मी नव्हे कुणी कवी
भास माझा मी कवी असण्याचा
जोड शब्दांची अन् आस भावनांची
ही लेखणी आसवांची असे नवी
मी नव्हे कुणी कवी
संसाराचे रड गाऱ्हाणे अन् प्रेमाचे फितूर होणे
कित्येक दिनी कोपऱ्यात मन मारून राहणे
त्या भावना,ती प्रीत मी पानी पेटवी
मी नव्हे कुणी कवी-
#ओळकवि_राम
👉Original quotes, Poems, Lines... From heart
👉first eye open at 4th... read more
देवावर प्रेम सर्वांनाच आहे. ...पण 'त्याच्या घरी जायची घाई मात्र कुणालाच नाही.
आपल्या घरात सर्वांनाच देव हवा. ...पण त्याच्या घरी आपण जायच्या विचाराने मात्र मनात धडकी भरते.
देव आपल्या घरी आला म्हणजे, 'सण, उत्सव आणि आनंद.' आपण त्याच्या घरी गेलो म्हणजे, 'दुःख, शोक'
देव आपल्या घरी यावा म्हणून आटापिटा. आपण त्याच्या घरी जाऊ नये म्हणून आटापिटा.
देवाघरून येणं म्हणजे 'जन्म'. देवाघरी जाणं म्हणजे 'मृत्यु',
दोन्ही अटळ आहे. पण ह्यामधली जी गंमत आहे, त्यालाच 'आयुष्य' म्हणतात.
- व.पु.काळे-
शायद आप समझ जाते
आप क्या मायने रखते है हमारे जीने में
बात कभी शब्दों में बयां नहीं करते
मतलब यू नहीं की लब्ज तुम्हे याद नहीं करते
हम पूरा हस भी नहीं पाते
क्योंकि हसी आपसे बटना चाहते हैं
और रोते है दोगुना
क्यों की आपकी मुश्किल हम सहना चाहते
शायद आप समझ जाते-
हे लग्न वैगेरे मस्तच असतं
नाहीतरी फाटकी कापड नेसणार
रंगबेरंगी साड्या मिरवत असतं
शंभर दोनशे न अंग झाकणार कापड
इथं हजारों ने ही मिळत नसत
हे लग्न वैगेरे मस्तच असतं
लग्नाची गजबज अन् वऱ्हाड्यांची लगबग
कशी ओसंडून वाहत असते
काही बघत्यात नवरदेव नवरी वा मंडप
अन् काही नुस्त वरण पोळी वरपत बसत
हे लग्न वैगेरे मस्तच असतं
अरेंज मॅरेज च सांगतो तुम्हांस्नी
दोन मिनिटांची भेट अख्खं आयुष्य चा निकाल लावून अस्त
म्हणू हो की नाही यातच त्याच बारा वाजत अस्त
हे लग्न वैगेरे मस्तच असतं
ठरलं एकदा की कॉल वैगेरे यांनी अनिवार्य केलेलं
अन् चॅटिंग जणू जबरदस्ती चा रामराम
अख्खी रात जागून ह्म्म अन् बरर (brr)
यातच यांचं बोलण होत असतं
हे लग्न वैगेरे मस्तच असतं-
सुख दुःखाचा बाजार येथे भरत बिघडत असतो
ऊन पाऊस वाऱ्याचा खेळ हा अखंड चालतच असतो
जीवन हे असेच असते
काल पिल्लू म्हणणारे आज खडूस ,उद्या मर तिकडे म्हंत्याले,
जीवन हे असेच असते
खांद्यावर हात ठेवतात की पायात पाय घालून पाडावे
अन् उडणाऱ्या पाखराचेही पंख उडवावे
जीवन हे असेच असते
ज्याशि जुडावी प्रीत ती प्रीत जाणतच नसते
रस्त्यावरील खड्डे अन मनावरचे लचके हे संपतच नसते
जीवन हे असेच असते..-
या मातीत माझ्या
बिया जसी पेरवे, तसी रोपटे खुलावे
झोळी फळे भरावे,या मातीत माझ्या
जीव इथे तरावे,जगण्या बळ यावे
मज श्वास हि हरवे,या मातीत माझ्या
हिरवी जशी शिवार,मज धुंदतो आवर
विश्व बनू पाहते,या मातीत माझ्या
या रती जन्मावे,या जगी मन आकळे
ऐसे रत्न न सापडे,या मातीत माझ्या-
हरबार कलम उठाई है
ताकि तुम्हे भूल पाउ
लिख के पता चला की
तुम्हे ही लिखता जाऊ-
Something must have to end to start something unbelievable...
-
हल्ली तुझ्यातली तू दिसत नाहीस ये
मेकअपचा नुसता मारा आहे तुझ्या चेहऱ्यावर
तुझी निरागसता झाकली जाते त्याने
सतत आरशात बघत बसते ,सौंदर्य तुझे शोधत असते
स्वतःतिल स्वतःला विसरून
हल्ली तुझ्यातली तू दिसत नाहीस ये
'संतूर' साबनाच्या ऐड मधील मम्मी सारखी,
कधी 'स्टेफ्री'च्या तरुनीसरखी,
तर कधी मैनफोर्स च्या सन्नीसारखी बनु पाहते आहे
स्वतःतिल स्वतःला विसरून
हल्ली तुझ्यातली तू दिसत नाहीस ये
निसर्गाला सोडून मॉल मधील तुझी पसंदी
आई-बाबा बाबा सोडून मम्मी-पप्पाची तुझी हाक
मॉडर्नच्या नावावर संस्कारांचा कचरा केला आहेसच तू
सौदर्य म्हणून विद्रूपता साकारली आहेस तू
स्वतःतिल स्वतःला विसरून
हल्ली तुझ्यातली तू दिसत नाहीस ये-
ऐसी सिंधुताई होणे नाही
किती असह्य सहीले,किती उपरे भोगिले
किती केलेस ते यत्न अन् उभे केले माणुसकीचे यज्ञ
अनाथांची बनली माऊली अन् उघड्यांची सावली
ऐसी सिंधुताई होणे नाही
जाहली मुलगी म्हणून नाव चिंधी ठेवियले
कर्म ऐसे केले की जगी माई म्हणविले
शिक्षा नव्हे फार केले तरी शिकवणूक जगा दिली
गुरख्यांच्या हक्की बंड सरकारी शेणाचा उभारीला
गुरख्यांना जिंकून शेण चींधीची झाली ताई सिंधू
ऐसी सिंधुताई होणे नाही
दमाडाजिने किती चारित्र्य ओरखडीले
गर्भ होता पोटी तरी घर,गावी बाहेर काडीले
किती सहिले माईने,किती सोसले त्या जीवाने
आपले सह्ये न यावे इतरांच्या फेटी,*ममता सदन* उभरीले
ऐसी सिंधुताई होणे नाही
कित्येक संस्था स्थापिल्या कित्येक पडत्या उभरील्या
भुकेल्यांच्या पोटी घास भरविला अनवाणी वाटी चादर दिधविली
गरिबांच्या लेकरा मोठं आसरा दिसला अन् त्यासनी माईतच विठ्ठल भासला
ऐसी सिंधुताई होणे नाही-