13 APR 2019 AT 23:36

नको समजू तूच शहाणा बाकी सारे वेडे,
परमेश्वराचे अस्तित्व नाकारून जगाचे
सुटणार नाही कोडे...

असे किती दिवस तू स्वतःला फसवत राहशील
तुझ्या सावलीला तू तुझ्यापासून कस काय विलग करशील...

नको जाऊ त्याला शोधण्या
मशिदी, चर्च वा काशी-पंढरपुर..
स्वतःतच डोकावून बघ जरा नीट,
तुला तुझ्यातच दिसेल त्याच स्वरूप...

स्वतःचा मी पणा जपण आता तरी सोडून दे
कधी कुणा थकलेल्या जीवाला जगण्याची हिंम्मत दे..

थकशील-भागशील सारीकडे फिरशील
अन एक दिवस नकळत तू,
त्याच्याच चरणांवर विसावशील

- Jyo-ती