नात्यास नाव अपुल्या,
काय दयावे समजेना.
तुझ्यापासून दुर,
काही केल्या राहवेना.
नात आपल मैत्रीच्या,
पलीकडे कधी गेल,
काही केल्या कळेना.
सांगू तुला कशा,
माझ्या भावना,
काही केल्या सुचेना.
मनात तुझ्या, काय चाललय,
ते ही काही कळेना.
प्रेम तुझ्यावरच विसरता मला,
काही केल्या जमेना.
उठलेले वादळ मनात
काही केल्या थांबेना.
दुर जाताना,
तुला, मला पाहवेना.
मैत्री की प्रेम ?
काय नाव दयाव या नात्याला,
काही केल्या समजेना.- JITU/G2/GG-THEMINDSEEKER
30 NOV 2018 AT 9:30