गणपतीच्या मंदिरात
अगरबत्ती चा पुडा ,
गणपतीच्या मंदिरात
अगरबत्ती चा पुडा ,
message नाय
online नाय
ठरलाय का साखरपुडा …?
-
आठवणींच्या बांधावरचं
स्वप्न जे आपण पाहिलेलं
आठवणीत रमणारं
हळवं मन आपण जपलेलं-
ओळखून मी तुला
जरा जरा खुणावले
लाजऱ्या मनातुनी
उधाण डोह पेटले..
प्रश्न आकळून मी
कधीच उत्तरे दिली
अधीर स्पंदनांतुनी
नवीन आस जागली
सूर मीच ताल मी
तुझी अबोल धून मी
तुझ्याच पुस्तकातली
अनाम एक खूण मी
गंध हे ..-
तुझ्या हृदयाचे ठोके
अजून ऐकू येतात माझ्या कानात
तो नाद.. अनाहत..
माझ्या मनात..
तुझ्या गळ्याशप्पथ
अजून आहेत जसेच्या तसे
तुझे स्पर्श,
तुझ्या गळ्याशप्पथ
अजून आहेत जशीच्या तशी
अबोलीची कोवळी वर्षं..
आता जाणवत नाही
ती फक्त
तुझी गरम ऊब !
~ jayesh
#म-
गिळण्यास प्राण उठला जरीं ही कृतांत।
संभाजी धर्म जगले जळत्या रणांत।।
सूर्याहुनी ही अति दाहक धर्मभक्ती।
स्फुरण्यास नित्य धरुया शिवपुत्र चित्तीं।।
स्वराज्याचं धाकलं धनी #धर्मवीर 'छत्रपती संभाजी राजे' यांचा आज स्मृतिदिन.
#बलिदानदिन
#शौर्यदिन-
रिकाम्या मनांच्या विनवण्या करुनी
कुठले गाभारे भरणार मी..
कोरड्या शब्दांचे फुलोरे सारे
जलाशय मनाला कुठून देणार मी
-