29 JUN 2020 AT 20:32

मी विसरले होते सगळं,त्यालाही विसरले होते...
पण तो दूर निघून जाताना मन काहीतरी सांगत होते...
स्वप्नातही यायचा तो तरी त्याला ओळखू शकत नव्हते,
रोज रोज प्रयत्न करूनही दूर जाऊ शकत नव्हते,
सगळ्यांना विसरले होते तरी तोच का आपलासा वाटे?
सार जग खोटं आणि त्याचा शब्दांवर विश्वास बसे...
हेच ते नात शब्दांचा पलीकडचं सतत हवं हवं वाटणार,
कोणते बंध होते आमच्यात आम्हाला कळलच नाही...
मी बेबंध होते आधीपासून त्याने मला बांधून ठेवले,
मैत्रीची मर्यादा जपूनच मला आपलंसं केलं...
आयुष्याचा पुस्तकातली ती सर्वात सुंदर गोष्ट होती,
पूर्णत्वाकडे चालू लागली गोष्ट त्याची अन् माझी...

- Jagruti Pujare