नाही तुझा नाही तिचा नाही कुणाचा आपला
गुंतू नका कोणी, जरी रेशीमधागा वाटला
येशील तू हसशील तू पण सांगतो इतकेच की
मी भेटतो अन बोलतो समजू नको तू चांगला
जाणून मी आहे खरी साऱ्या जगाची रीत ती
जगला बरा तो गप्प जो अन बोलला तो कापला
हा वर्ण जाती धर्म अन हा भेद माझी योजना
मी राहतो तुमच्यात पण नाहीच मी तुमच्यातला
तळपायचे तळपून घे विझशीलही नोंदून घे
नुसत्या तुझ्या उन्हात या सागर कुठे हा आटला-
जीसीसे सुर्ख है मौसम,
उसे तांबुल भेजा था
उसी एक फुल को मैने
गुलाबी फुल भेजा था
-
एखाद्या अनाहूत क्षणी
अचानक...
तू चटकन बावरत असशील...
हृदयाचे ठोके वाढत असतील...
अंगावर शहारे येत असतील...
तू गालात हसत असशील...
आणि कदाचित... त्यांनंतर...
लाजत असशील...
निमित्त,
माझी आठवण तुला येत असेल...
एवढंसुद्धा खूप आहे माझ्यासाठी...
त्या तेवढ्या सगळ्याची
कसर भरून काढण्यासाठी...
-
जळालो मी तरी चालेल पण बिलगायचे आहे.
दिव्या, पेटव मला! क्षणभर जिणे उजळायचे आहे.
जरी तू स्वर्गराज्ञी अन तुझा दरबार आकाशी;
तिथे वेशीवरी तोरण मला बांधायचे आहे.
अशी स्वप्ने तुझी माझी जणू सोने हिरे पाचू:
तुझ्या स्वप्नात माझे स्वप्नही सजवायचे आहे.
कसा मी पार गुरफटतो तुझ्या कोशात शिरताना;
कुमुदिनी, काय जादू तू? मला शोधायचे आहे.
जरासे ऐक ना माझे, जराशी बैस बाजूला;
तुझ्या केसात हलके चांदणे माळायचे आहे.
उशाला रातराणी रोज माझ्या कुंद दरवळते;
तुझ्या फायात शृंगारुन तिला जळवायाचे आहे.
इथे मी मांडतो मतला खयाली तूच तू माझ्या;
उला तू, मी तुझा सानी; मुकर्रर व्हायचे आहे.-
तिनं विचारलं, "त्यानं काय होतं?"
तेच होतं जेंव्हा...
थंडीला ऊब जाणवल्यावर होतं
उन्हाला पहिली सर भेटल्यावर होतं
तहानेला पाणी मिळाल्यावर होतं
हवेला सुगंध पसरल्यावर होतं
अंधाराला एखादा झरोका दिसल्यावर होतं
चालताना वाटेत चेंडू गवसल्यावर होतं
झिम्माड पावसात कटिंगचे सिप मारताना होतं
तुझी एखादी कविता वाचल्यावर होतं
शाळेचा पहिला दिवस
नव्या पुस्तकांचा वास
निसरड्या वाटा
डबक्यातल्या उड्या
टिपणारे थेंब
पायांच्या गिरक्या
पसरलेले हात
झाकलेले डोळे
मंद धुंद कुंद स्वच्छंद बेबंद...
तसं अगदी तस्संच होतं
तुला पाहिल्यावर...-
वेड्या,
तू जो इंद्रधनू बघून आनंदी होतोस
तो दुसऱ्याच्या रानावरचा पाऊस असतो
-