Hruturaj shirole   (hruturaj)
32 Followers · 3 Following

Writer
Joined 26 September 2019


Writer
Joined 26 September 2019
25 DEC 2023 AT 21:26

किनार्-यावर बसून दिसणारा समुद्र, भरतीसोबत नजरेआड जाणारी ओहोटीसह पुन्हा दर्शन देणारी किनार्-यावरची दगडं, पावसाच्या तिरीपीत वाळूत अंग चोरून ऊबीसाठी धडपडणारी कुत्री, हरकोशिश प्रयत्न करून नारळ विकणारा, रेतीत पाय पसरून सुखाच्या शोधात सिगारेटचा धूर सोडणारा, अनोळखी दुनियेत डोळ्यांची नजरानजर होऊन चमकणारा चेहरा आणि त्यानंतर भानावर येऊन पुन्हा किनार्-यावर बसून दिसणारा समुद्र पण ह्यावेळी सोबत सायंकाळचे दाटून आलेले काळे नभ आणि परतीच्या बेरजा…

-


10 NOV 2023 AT 8:52

हिंदूनृंसिह प्रतापगडी अवतरला,
छत्रपतींनी अफजल फाडला.

-


11 JUL 2023 AT 22:47

तू पहाटे गवताच्या पानावर अलगद स्थिरावलेला दवबिंदू,
तू दूपारच्या भर उन्हातली लिंबाखालची सावली,
तू सायंकाळच्या सूर्यास्ताची आकाशावर उधळलेली विविधरंगी रांगोळी,
तू रात्रीचा नदीकाठावर अंगाला भिडणारा गार वारा.

-


12 MAY 2023 AT 9:32

अगदी खैबर खिंडीतून झालेली आक्रमणे ते आजपर्यंतचा इतिहास पाहिला तर एकच सामान्य निष्कर्ष निघतो तो म्हणजे हिंदूद्वेश. मग ते मंदिरांची - देवदेवळांची केलेली तोडफोड असो किंवा हिंदूंची जातीमध्ये केलेली फोड आणि त्याचा उठवलेला फायदा असो, प्रत्येक वेळी हिंदूंची अस्मिता संपविण्याचा केलेला प्रयत्न आजपर्यंत जरी यशस्वी झाला नसला तरी होणारच नाही म्हणून डोळे झाकून मुद्दाम दुर्लक्ष करणं किती महागात पडेल हे पाकिस्तान, बांग्लादेश आणि काश्मिर मधल्या हिंदू जनसंख्येवरून लक्षात येईल. सह्याद्रीच्या छत्रपती पिता-पुत्रांनी उभा केलेला संघर्ष आपल्याला आजचा दिवस दाखवतोय नाहीतर आजची परिस्थिती काय असती हे सांगायला ज्योतिषाची गरज नाही.

“द काश्मिर फाइल्स” असू दे किंवा “केरला स्टोरी” ह्या माध्यमातून हे जे भीषण वास्तव मांडलय त्याकडे आपण जर फक्त चित्रपट म्हणून कानाडोळा करत असू तर भविष्यात ह्याची होणारी पुनरावृत्ती आपलं अस्तित्वच नष्ट करेल हे लक्षात घेतलं पाहीजे. हे तर केवळ दोन-तीन चित्रपट झाले, असे कित्येक प्रसंग कितीतरी हिंदूंसोबत दररोज घडत असतील, तोडफोड केलेली मंदिरे आणि रायगडावरच्या जगदीश्वर मंदिरासमोरचा भग्न नंदी हेच सत्य सांगतोय की स्वतःआधी धर्म जपला नाही तर धर्मासोबत आपलंही अस्तित्व भंगायला वेळ लागणार नाही.

-


5 MAR 2023 AT 17:51

डाग चंद्रावर असो किंवा चारित्र्यावर लोकांना नेमका तोच दिसतो.

-


4 MAR 2023 AT 18:37

गालावर काजळाचा ठिपका लावून नजर लागू नये म्हणून केलेला प्रयत्न व्यर्थ आहे,
तीच्या हनुवटीवरचा तीळ हेच सांगतोय.

-


27 FEB 2023 AT 10:41

माझी मराठीची बोलू कौतुके,
परि अमृतातेही पैजा जिंके.

-


25 FEB 2023 AT 22:41

निदान बुध्दीबळाच्या खेळात तरी राणीचं आत्मबलिदान देऊन जिंकलेल्या लढती हेच सांगतात की राणीवर भाळलेला हमखास फसलाय.

-


12 JUL 2022 AT 21:55

कृष्णाला फक्त यमुना पार करायची होती, माझ्या राजाला त्याहून मोठी मगरमीठी. स्वतः वरूणदेव सह्याद्रीवर अवतरले होते महाराजांच्या सेवेत. केवळ पोशिंदा वाचला पाहिजे म्हणून हसत प्राणाची आहूती देणार्-या मावळ्यांचा देवेद्रालाही हेवा वाटला असावा. रक्ताचं उदकसिंचन करून धरती पावन केलेल्या त्या प्रत्येक नरवीराला अभिवादन.

-


17 MAY 2022 AT 23:11

पराधीन मनाला परिधान करून जगण्यात काय अर्थ आहे…

-


Fetching Hruturaj shirole Quotes