असंख्य चांदण्यांची तू एक कहाणी,
पूर्ण होता अवखळ लखलखणारी चांदणं न्यारी…
Shabda_pravas❤️-
Philosopher..
HemangiSA...
निर्मळ राहावे फुलाप्रमाणे
विचारलाच पत्ता तुझा तर सांगेन,
मनमोहक सुगंध आणि कोमल भाव
बहरुन येतो मी पण ऋतुत माझ्या,
पण कधी सोडत नाही रंगून जाणे
तिथे तेच माझे घर असावे जिथे
मी फुल म्हणून शोभून दिसावे…
Shabda_pravas_❤️-
फुलांप्रमाणे
रंगात रंगूनी जावे..
बहरून थोडे
साधेपणाने जगावे…
Shabda_pravas_❤️-
उस वक्त मे सुकून है जहाँ
वक्त को ही वक्त मिला हो,
और उस वक्त मे हर एक
पल गुमनाम है जिस पल को
वक्त का मात्र इंतज़ार हो…
Shabda_pravas_❤️-
धुंद दिसता आकाशात सारे
त्यात सहारा होता चंद्राचा,
दिसला की चंद्र बाकी
आकाश होते अवखळ काळे,
ठळक व्हावी त्याची छटा म्हणून
नभाने सामावून घेतले काळोखास स्वतः
Hemangi❤️-
बाप्पा तुमच्या चरणी नतमस्तक
होताना एकच मागणं असावं
प्रत्येक्षात दिसत नसला जरी तुम्ही तरी
तुमचं अस्तित्व तुमच्या डोळ्यातच पाहता यावं…
Hemangi❤️-
प्रवाह शांत असो किंवा अशांत
पण प्रवाहासोबत राहून सुद्धा
अस्थिर होऊन स्थिर होता आलं पाहिजेल…
Hemangi❤️-
एकांत मज गाठतो असा
जणू काही खूप दिवसाची
भेट उधार आहे स्वतःवर..
मग प्रश्न इतके कि
उत्तरच न मिळावं…
उत्तर असे कि
प्रश्नच न थांबावे…
भेटतो मज एकांत असा
ज्यात पुन्हा शोधून
स्वतःला सापडावे वाटते..
Hemangi ❤️
-
असंख्य चांदण्यांची
आरास या नभात
नभासही स्पष्ट असावे
की चंद्र आला आहे
आज नभाच्या प्रवासास…
Hemangi ❤️
-