असा फक्त माझा... मित्र आहे!
तशे तर बरेच आहेत दुःख विचारनारे,
पण ज्याच्यापाशी व्यक्त केल्याने कमी वाटतं ते दुःख, असा फक्त माझा... मित्र आहे!
तशे तर बरेच काम आहेत वेळेवर करायसाठी,
पण सोबत ज्याचा वेळेचच भान राहत नाही, असा फक्त माझा... मित्र आहे!
तशे तर बरेच आहे सो कॉल्ड फ्रेंडशिप मध्ये 'दोस्त की बेज्जती' ची पाटी लावणारे, शिवाय माझा वैयक्तिक जीवनाची उधडपट्टी करणारे,
पण असूनही एवढा जवळचा, आपली मर्यादा समजतो, असा फक्त माझा... मित्र आहे!
नेहमी माझा यशाचं कारण बनेल असं गर्जेच नाही,
पण अपयशाचा दरित माझ्या मनाची कोसळ सांभाळतो, असा फक्त माझा... मित्र आहे!
समजावनारे, बोलणारे तर शेकडो आहेत उभे,
पण ऐकून घेतो मला - समजून घेतो मला काहीही न बोलता, असा फक्त माझा... मित्र आहे!
अस्वस्त होते मन जेव्हा चूक माझीच असते,
पण सहज चर्चा करतो माझाशी मला जज न करता, असा फक्त माझा... मित्र आहे!
हजारो नंबर आहेत मोबाईल कॉल बुक मध्ये,
पण आलेली अडचन किव्वा झालेली खुशी व्यक्त करायसाठी ज्याला सर्वात आधी फोन लागतो,
असा फक्त माझा............................. मित्र आहे!
-