Harsh Rane   (हर्षवर्धन)
302 Followers · 34 Following

Hobby writer
Interested Fields:
Social life
Human Behaviour
Motivational
Sardonic
Joined 18 November 2016


Hobby writer
Interested Fields:
Social life
Human Behaviour
Motivational
Sardonic
Joined 18 November 2016
27 NOV 2016 AT 20:02

"Dear crush,
I love you so much, but I can't express my feelings towards you. Not because I am bad at expressing myself, but I don't dare to speak when I see you!
No, I am not a coward, but it's the fear of losing you! It's the fear of destroying our healthy and clean friendship!
Yes, I do love you but I can't afford to lose you! Maybe you have never thought of me like this, but I have been thinking of you since ages! It's just the care for you, nothing else more than the 'love', and not the 'lust'!
Yes, it's difficult for you to judge all the 'nominees', and after failing so many times in the judgement, after going through all the bad patches of 'love life', you will say why should I trust you, you are no different than others!
I know, I am not handsome, I am not charming, I don't know how to romance, but I do know that I love you, I know that I am not a swindler! it's just the purest feeling to stay with you, to see you happy, to make you feel good when you are in a bad mood! It's so simple yet very difficult to express! "
It's my inferiority complex, that repels me from approaching her! Because in this world, physical beauty is praised more than the beauty that lies within us!

-


21 NOV 2016 AT 21:09

'पहली नजर में प्यार' झालं
म्हणणारे लोक स्वतःलाच फसवत असतात,
देहलालसेचे बळी ठरतात.
जो पर्यंत अंतर्मनाची ओळख पटत नाही
तोपर्यंत त्या भावनेला प्रेम म्हणायचं का?



-


21 DEC 2020 AT 7:28

Why are we brought up in such a way that we become selfish?

-


7 AUG 2020 AT 2:32

उशीर

त्या संध्याकाळी ती पुन्हा आमच्या नेहमीच्या भेटायच्या ठिकाणी आली
मी सुद्धा पोहोचलो होतो, नेहमीप्रमाणे तिच्या आधीच
पण खरंतर आज थोडा उशीरच झाला होता
ती आली आणि बसली
खूप सुंदर दिसत होती ती आज, नेहमीप्रमाणेच

COMPLETE WRITE-UP IN CAPTION

-


21 JUL 2020 AT 0:50

श्वास गुदमरेल इतकी गर्दी
आसपासचा क्रूर गडगडाट
ह्या पिसवांवर निस्वार्थ बरसण्याचा
तेवढाच काय तो आनंद

टकटकटकटक कटकटकटकट
तीच गिरकी रोजची तीच गरगर
हास्यास्पद प्राक्तनावर स्वचर्चेचा
तेवढाच काय तो आनंद

शरीर चंचल नाही स्वस्थ
मन निश्चल ना जागा सोडत
वाहत्या वाऱ्यावर गात राहण्याचा
तेवढाच काय तो आनंद

चंद्र गाठून कवेत घेण्याची
ऐपत नसल्याचे दुःख
उसनवारी प्रकाश झेलत झुरण्याचा
तेवढाच काय तो आनंद

-


8 JUL 2020 AT 4:07

प्रेयसीच्या नखऱ्यांमुळे स्वाभिमान जर देशोधडीला नाही लागला तर किंमतच ती काय त्या प्रेमाची!

-


1 JUL 2020 AT 23:00

सुंदरता ती काय असावी
डोहांत खोलवर हरवावे
मार्ग परतीचा धरताना
सरस्वतीने हरखावे

हिंमत म्हणता कशी असावी
मोड वेगळे स्वार करावे
पौरुष्याला मागे टाकून
शिखर यशाचे गाठावे

त्याग तो कसा असावा
जीवन कुटूंबास अर्पावे
भार एकला पेलताना
ज्योत तेजीने पेटावे

-


17 MAY 2020 AT 2:27

क्षण काही आठवायचे
त्या मोत्यांत भुलायचे

सुधाकरास पहायचे
अन् हलकेच झुरायचे

-


5 MAY 2020 AT 13:45

खचलेल्या मनासाठी जो मार्ग दाखवतो
तो वडिलांचा अनुभव आहे
केविलवाण्या चेहऱ्यासाठी जी आशा दाखवते
ती आईची माया आहे
भरकटलेल्या आयुष्याला जे आणखी एक संधी देते
ते वडिलांचे औदार्य आहे
मुलांच्या आनंदामध्ये आपले समाधान शोधतो
तो आईचा भाबडेपणा आहे
जीवनाच्या खेळामध्ये आपण जे षटकार मारतो
ती आई-वडीलांच्या प्रथम भागिदारीची कमाल आहे

-


29 APR 2020 AT 22:55

बरेचदा आपण एखाद्या घटनेमध्ये चुकीच्या बाजुला असल्यामुळे दुःखात सापडतो. आपण घटनेच्या नेमक्या कुठल्या बाजुला आहोत ह्यावर आपल्याला आनंद होणार आहे की दुःख हे ठरतं.

एखाद्या व्यक्तीची नोकरी जेव्हा जाते, तेव्हा ती दुसऱ्याला कुणालातरी मिळते. एखादा संघ जेव्हा खेळात जिंकतो, तेव्हा समोरचा संघ हरलेलाही असतो. कुण्या एका जोडप्याचे संबंध बिघडतात, तेव्हा कुठेतरी नवा प्रेमाचा बहरही येतच असतो. जीवन मृत्युचंही तसंच. नवीन जीव विश्वात प्रवेश करतो, तेव्हा कुणीतरी आपल्याला सोडूनही जातं.

नॉर्वे देशाच्या काही भागांत महिनोन्महिने सूर्य उगवतच नाही. पण जेव्हा उगवतो, तेव्हा लवकर अस्तालाही जात नाही. आयुष्याला एका घटनाक्रमाप्रमाणे जर आपण पाहिलं, तर त्याचंही असंच काहीसं आहे, आपण प्रत्येक घटनेत नेमके कुठल्या बाजुला आहोत ह्यावर सगळं अवलंबून आहे. दुःखात असू, तर सूख नक्की दारावर आलंय आणि सुखात असू तर दुःख नक्की येणार चहापाण्याला. कधीतरी थोडं बसून, आराम करून, जेवूनही जाईल. आणि जाताजाता हिशोबही घेऊन जाईल आपल्या यातनांचा, म्हणजे जेव्हा सूख येईल, तेव्हा परतफेड करूनच जाईल त्याची.

-


Fetching Harsh Rane Quotes