गुंतलो असतो पुन्हा तुझ्यात पण
आता पुन्हा गुंतायची भीती वाटते
शांत झालेल्या निखाऱ्याला
पुन्हा फुंकण्याची भीती वाटते
ना तक्रार कोणती माझी
ना हवा करार करावयास कोणता
मी लढू शकतो पुन्हा आयुष्याशी पण
आता जिकायची भीती वाटते
-
तुला समजणार नाही
कोणालाच समजणार नाही,
पण वस्तूस्थिती हीच आहे
योग्य ठिकाणी
थांब ना,सॉरी,किंवा तूच,
बोलता न आल्याचं प्रायश्चित
आयुष्यभर कविता लिहून करावं लागतं-
पूजा करने का कोई सिद्धांत नही है,परमात्मा हर ऊस दिल की सूनता है,जो पवित्र निर्दोष और इमानदार है
-
तुमच्या आयुष्यातून लोक जातात?
खरं तर ती जात नसतात ती काढली जातात,
नियतीचे डाव आजपर्यंत कुणाला समजले नाहीत,
तुमच्या मागे तुमच्या बद्धल काय बोलल जातं हे ऐकण्याची क्षमता फक्त तिच्याकडे आहे ,
तुमच्या vibs wavy match होतील अशीच लोक शेवटपर्यंत सोबत राहतात,
चांगली लोक पाहिजे असतील तर आपण आपली आभा तेवढी तेजोमय करायला हवी,अनेक त्रास कमी होतील
बगुया जमतंय का?
अमृतबोल❤️
-
माणूस हा त्याच्या जाहीर विचारपेक्षा , त्याच्या खाजगी वर्तनामुळे ओळखला जातो,
वर्तन ही डोळ्यांना दिसणारी गोष्ट आहे,विचार अदृश्य असले तरी ते वर्तवणुकीतूनच दृश्यमान होतातच-
एकटं एकटं चालताना
आपलं आपलं गाणं गात जावं
आतल्या आतल्या पावसात
डोळे मिठुन न्हात जावं,
भिजलेल्या मातीला
निर्मितीचे ध्यास असतात,
सोबतीला अखेरपर्यंत,
आपलेच फक्त श्वास असतात!-
जेव्हा प्रयत्न करूनही शब्द पारतंत्र्यात जातात ,तेव्हा शब्दाची जागा डोळे घेतात ओथंबून वाहू लागतात,या अवस्थेतील अश्रूंची किम्मत ही शब्दांपेक्षा खूप मोठी असते
-
स्वतःची सुद्धा काही तत्व असावी,आणि त्यांच्यासोबत मरेपर्यंत प्रामाणिक रहावं
-
विस्तवाला घमेंड असते की माझ्या दाहकतेमुळे लोकं माझ्यापासून दूर आहेत. पण त्याला हे कळतं नसतं की दुसऱ्याला पोळवण्याच्या नादात त्याने स्वतःलाच जाळून घेतलंय...🥀 लोकं काय आज ना उद्या दूर जातील` कारण विस्तवात कोण हात घालणार..? पण विस्तवाचा कधी ना कधी कोळसा होणारच की..🪨 काही माणसांचं पण तसचं असतं. कदाचित ते कित्येक माणसांना विस्तवासारखे पोळवत जातात; त्यांना वाटतं की लोकं त्याना घाबरत आहेत_ पण त्यांना हे माहित नसतं की समोरच्याला विस्तवाच वास्तव कळलं आहे .. 🌿
-
माणूस अपमानाने जेवढा दुःखी होत नाही,
त्याहून अधिक कौतुकाने फार लवकर अहंकाराचा डोंगर चढतो,
अश्या माणसाचा कडेलोट सहज शक्य आहे-